AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स; ‘कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर..’

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. प्राजक्ताच्या या पत्रकार परिषदेनंतर तिच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत नेटकरी पाठिंबा दर्शवत आहेत.

पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स; 'कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर..'
prajakta mali
| Updated on: Dec 29, 2024 | 3:23 PM
Share

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावं त्यांनी घेतली. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशीही मागणी प्राजक्ताने केली. या पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ताच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करत काहींनी तिला पाठिंबा दर्शविला आहे.

‘प्राजक्ता ताई, तुझी पत्रकार परिषद पाहिली. एवढं सगळं होऊन पण ज्या संयमाने, धैर्याने तू सगळं घेतलंस आणि बोललीस, त्यासाठी तुझा अभिमान वाटतो. तू बोललीस ते अगदी बरोबर आहे. असा काहीतरी कायदा झाला पाहिजे, कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर बोलायची हिंमत पुन्हा कुणाची होता कामा नये. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ असं एकाने लिहिलंय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी कलाकारांचे नाव घेतले जात आहेत, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तू हिंमत नको हारू’, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे.

शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता म्हणाली, “सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण मी शांत होते म्हणजे या सगळ्याला माझी मूकसंमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे.”

“तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? असा संतप्त सवाल प्राजक्ताने विचारला. ती म्हणाली ” अतिशय कुत्सितपणे त्यांनी ही टिप्पणी केली. परळीला पुरूष कलाकार गेले नाहीत का? एका फोटोच्या आधारे तुम्ही कोणासोबतही नाव जोडणार का? वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं घेतली जातात,” असा आरोप प्राजक्ताने धस यांच्यावर केला.

Follow Us
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला