Dharmendra | ईशा देओलचा व्हिडीओ पाहून धर्मेंद्र यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले ‘निष्काळजी वडील’

नातवाच्या लग्नात त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला आणि मुलींना बोलावलं नाही, असा आरोप नेटकऱ्यांनी केला. तर हेमा मालिनी या खूप मोठ्या स्टार आहेत, त्यांना धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी बनण्याची गरजच काय होती, असाही सवाल काहींनी केला.

Dharmendra | ईशा देओलचा व्हिडीओ पाहून धर्मेंद्र यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले निष्काळजी वडील
Dharmendra, Hema Malini and daughter Esha Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 05, 2023 | 11:07 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्ह-स्टोरी सर्वश्रुत आहे. मात्र लग्नानंतर हे दोघं सर्वसामान्य विवाहित जोडप्यांप्रमाणे एकत्र राहू शकले नाहीत. करिअरच्या शिखरावर असताना हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी ते आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा यांच्याशी लग्नानंतरही ते त्यांच्या पहिल्या कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतीत करायचे. नुकताच हेमा मालिनी आणि त्यांच्या ईशा-अहाना या दोन्ही मुलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी धर्मेंद्र यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

हा व्हिडीओ सिमी ग्रेवाल यांच्या शोचा आहे. आयुष्यात जीवनसाथीच्या पाठिंब्याची किती गरज असते याविषयी हेमा बोलत आहेत. मुलांबद्दलचे काही निर्णय घेण्यासाठी जोडीदाराची खूप गरज असते, असं त्या म्हणताना दिसतायत. हेमा पुढे म्हणतात की जेव्हा कधी धर्मेंद्र मुंबई असायचे तेव्हा ते कुटुंबीयांची नक्की भेट घ्यायचे आणि मुलींच्या शिक्षणाविषयी विचारपूस करायचे. त्यांनी पुढे असंही सांगितलं की मुलींनी नेहमी पंजाबी सूट, कुर्ता-सलवार असेच कपडे परिधान केले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जेव्हा कधी ते घरी भेटायला यायचे तेव्हा मुली कुर्ता-सलवार किंवा पंजाबी सूट घालायच्या.

या व्हिडीओमध्ये ईशा देओल तिच्या करिअरबद्दल बोलताना दिसतेय. वडिलांना त्याचा स्वीकार करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करेन, अन्यथा ते रागावतील, असं ती म्हणते. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा ईशा 16-17 वर्षांची होती. “मी घरीच राहावी अशी वडिलांची इच्छा आहे. माझ्याबद्दल ते खूप पोझेसिव्ह आहेत. त्यामुळे मला फार बाहेर जाण्याचीही परवागनी नाही,” असं ती सांगते.

ईशा म्हणते, “ते आमच्याबद्दल खूप पोझेसिव्ह आहेत. मुलींनी घरीच राहिलं पाहिजे, पंजाबी ड्रेस घातला पाहिजे असं ते म्हणायचे. आम्हाला बाहेर फार जायची परवानगी नव्हती. पण आईमुळे आम्हाला स्पोर्ट्ससाठी बाहेर पडायला मिळायचं. आम्ही राष्ट्रीय स्तरावरील खेळ खेळण्यासाठी घराबाहेर पडायचो.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी धर्मेंद्र यांना ट्रोल करत आहेत. धर्मेंद्र यांनी वडील असण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. जेव्हा मुलींना त्यांच्या वडिलांची सर्वाधिक गरज होती, तेव्हा ते त्यांच्यासोबत नव्हते, असंही काहींनी म्हटलंय.

काहींनी सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाचाही उल्लेख केला. नातवाच्या लग्नात त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला आणि मुलींना बोलावलं नाही, असा आरोप नेटकऱ्यांनी केला. तर हेमा मालिनी या खूप मोठ्या स्टार आहेत, त्यांना धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी बनण्याची गरजच काय होती, असाही सवाल काहींनी केला.