Ranbir Kapoor | ‘त्याने तुला 7 वर्षे डेट केलं म्हणून..’; नीतू कपूर यांचा रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना टोमणा?

रणबीर आणि कतरिनाचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र ज्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हाच त्यांचे मार्ग वेगळे झाले.

Ranbir Kapoor | त्याने तुला 7 वर्षे डेट केलं म्हणून..; नीतू कपूर यांचा रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना टोमणा?
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2023 | 3:30 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरने गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी आलिया भट्टशी लग्नगाठ बांधली. या दोघांना राहा ही मुलगी आहे. मात्र त्यापूर्वी त्याने कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या अभिनेत्रींना डेट केलं होतं. आता रणबीरची आई नीता कपूर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यांच्या या पोस्टचा इशारा रणबीरचे एक्स गर्लफ्रेंड्स दीपिका आणि कतरिना यांच्याकडे असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांना ट्रोल केलं आहे.

शनिवारी नीतू कपूर यांनी रिलेशनशिप आणि लग्नाविषयीची एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सशी लावला. त्यावरून काहींनी नीतू यांच्यावर टीकासुद्धा केली.

‘महिलांना एखाद्या वस्तूप्रमाणे वागणूक द्यायची असंच रणबीरला शिकवलं आहे वाटतं. मॉडर्न असल्याच्या नावाखाली तुम्ही तुमच्या मुलांना अशी शिकवण देऊ नका’, असं एकाने लिहिलं. तर ‘नीतू कपूर या नेहमीच कतरिनाच्या विरोधात होत्या. त्यांच्या ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतरही त्या टोमणे मारत आहेत. रणबीर आणि कतरिना सात वर्षे एकमेकांना डेट करत होते’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

नीतू कपूर यांची पोस्ट

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

रणबीर आणि कतरिनाचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र ज्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हाच त्यांचे मार्ग वेगळे झाले. ब्रेकअपच्या काही वर्षांनंतर कतरिना त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी आता ब्रेकअपच्या घटनांना एका प्रकारची शिकवणच समजते. आता मी आयुष्यातील काही गोष्टींकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागले आहे. उलट ब्रेकअपमुळे मी स्वत:वर अधिक लक्ष केंद्रीत करू शकले”, असं ती म्हणाली होती.