Neha Kakkar: “आमचं बालपणच उद्ध्वस्त केलं”; नेहा कक्करवर का भडकले नेटकरी?

| Updated on: Sep 19, 2022 | 1:02 PM

नेहा कक्कर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; 'या' कारणामुळे होतेय ट्रोल

Neha Kakkar: आमचं बालपणच उद्ध्वस्त केलं; नेहा कक्करवर का भडकले नेटकरी?
Neha Kakkar
Image Credit source: Twitter
Follow us on

गायिका नेहा कक्करचा (Neha Kakkar) सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिची गाणीसुद्धा अल्पावधीतच लोकप्रिय होतात. मात्र अनेकदा तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलही केलं जातं. नुकतंच नेहाच्या नवीन गाण्याचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) ‘सजना’ या गाण्याचा हा रिमेक आहे. मात्र हा रिमेक नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. फाल्गुनीच्या मूळ गाण्याचं नेहा कक्कर व्हर्जन ऐकून काही नेटकरी अक्षरश: तिच्यावर भडकले आहेत.

‘नेहा कक्कर आता पुरे झालं. टी सीरिज तुम्ही खिचडीचं दुकान उघडा. कारण तुम्ही गाण्यांची खिचडी छान बनवता, भयानक आहे हे’, असं एकाने लिहिलं. तर ‘नेहाने आमचं बालपणच उद्ध्वस्त केलंय. अक्षरश: भयंकर आहे हे’, अशा शब्दांत दुसऱ्याने राग व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

‘नेहमीप्रमाणे, नेहाने आमच्या बालपणीच्या या गाण्यासोबतच्या सुंदर आठवणी खराब केल्या आहेत,’ असंही एका युजरने लिहिलं आहे. जुनी गाणी रिमेक का केली जातात, नव्याने गाणी बनवता येत नाहीत का, असाही संतप्त सवाल नेटकऱ्यांनी टी सीरिज कंपनीला केला.

गायनाशिवाय नेहा एका रिॲलिटी शोचं परीक्षणसुद्धा करते. मात्र त्या शोमध्ये स्पर्धकांच्या गाण्याव्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यावरच अधिक लक्ष केंद्रीत केलं जातं, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘ई टाइम्स’शी बोलताना नेहा म्हणाली, “मी त्यांना दोष देऊ शकत नाही. असे अनेकजण आहेत, जे भावनिक नाहीत. अशा लोकांना कदाचित मी खोटी वाटू शकते. पण जे लोक माझ्यासारखे संवेदनशील असतात, त्यांना माझ्या भावना समजू शकतील. दुसऱ्यांच्या भावना समजू शकणारी आणि त्यांना मदत करणारी लोकं हल्ली फार कमी आहेत. माझ्यात ते गुण आहेत आणि मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही.”

नेहाने तिच्या करिअरची सुरुवातसुद्धा एका रिॲलिटी शोमधून केली होती. तिने बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यात ‘काला चष्मा’, ‘ओ साकी साकी’, ‘दिलबर’, ‘गरमी’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.