हेरा फेरी 3 धमाल करणार, हे मला माहिती, पण… ब्लॉकबस्टर सिनेमावर News9 Global Summit मध्ये सुनील शेट्टी हे काय बोलून गेला…

News9 Global Summit 2025 : न्यूज9 ग्लोबल समिट 2025 मध्ये द सिनेमॅटिक इव्हेस्टर या कार्यक्रमात सुपरस्टार सुनील शेट्टीने चार चांद लावले. यावेळी त्याने हेरा फेरी 3 विषयी सुरू असलेल्या वादावर मत व्यक्त केले. त्याच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेरा फेरी 3 धमाल करणार, हे मला माहिती, पण... ब्लॉकबस्टर सिनेमावर News9 Global Summit मध्ये सुनील शेट्टी हे काय बोलून गेला...
Hera Pheri 3 धमाल करणार
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jun 20, 2025 | 11:01 AM

न्यूज9 ग्लोबल समिट 2025 मध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सध्या हे समिट युएईमध्ये सुरू आहे. यामध्ये बॉलिवूडसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. बॉलिवूड आणि दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत दमदार भूमिका करणारे सुपरस्टार सुनील शेट्टी यांना या समिटमध्ये उपस्थिती लावली. त्यांनी द सिनेमॅटीक इन्व्हेस्टर नावाच्या सेगमेंटमध्ये सहभाग घेतला. त्याने अनेक विषयावर त्याची मतं मांडली. त्याने आगामी हेरा फेरी 3 या चित्रपटाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सुनील शेट्टी हेरा फेरी 3 बद्दल काय म्हणाला?

या खास सत्रात सुनील शेट्टी याला कोणत्याची सिनेमाच्या यशाचे गमक काय असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उदाहरण म्हणून त्याने आगामी चित्रपट हेरा फेरी 3 चा उल्लेख केला. मला माहिती आहे की हेरा फेरी 3 चित्रपट धमाल करणार. माझ्यामुळेच नाही, इतर कुणामुळे नाही. हे फ्रेंचाईजमुळे होईल. या तिनही लीड एक्टर्समुळे चित्रपट गाजणार. हा चित्रपट तीन कॅरेक्टर्समुळे चालेल. तुम्हाला शोले चित्रपट आठवतो का? या चित्रपटातील अनेक कलाकारांची नावे कदाचित तुम्हाला आठवत नसतील. पण त्यांची कॅरेक्टर्स, पात्र तुमच्या लक्षात आहेत. मला माहिती आहे की हेरा फेरी 3 ला यश मिळेल. मला माहिती आहे की, वेलकम टू -द जंगल पण यश खेचून आणतील.

कामच नाही तर नावाचा शिक्का पण महत्त्वाचा

पण मला हे माहिती नाही की माझी पुढील पटकथा, स्क्रिप्ट यशस्वी होईल की नाही. कारण हे विविध घटकांवर अवलंबून आहे. प्रत्येक माणूस, कलाकार सेफ गेम खेळू इच्छितो. सर्वच बॅनर्स काम करत आहेत. पण आता अनेक लोक स्क्रिप्टवर काम करताना दिसत नाहीत. जर तुम्ही पटकथा लिहून ठेवाल तर ती तशीच पडून राहील. तुम्हाला प्रत्यक्षात ती चित्रपटाच्या रुपाने उतरावी लागेल. जर संजय लीला भंसाली यांचा सिनेमा असेल तर कोणीही पण तो करणारच. या जाहिरातीच्या युगात असेच आहे की, कोणी पण पळत्या घोड्यावर पैसे लावतो. यशस्वी ब्रँडलाच एंडोर्स करण्यात येते. मान्यता देण्यात येते.