Nisha Rawal: विवाहबाह्य संबंधावर अखेर निशाने सोडलं मौन; म्हणाली..

चुलत भाऊ रोहित सेठियासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याने केला. मुलगा कविशलाही भेटू देत नसल्याचं त्याने सांगितलं. आता निशाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Nisha Rawal: विवाहबाह्य संबंधावर अखेर निशाने सोडलं मौन; म्हणाली..
Nisha Rawal and Karan Mehra
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 7:29 PM

अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) आणि करण मेहरा (Karan Mehra) यांच्यात जवळपास वर्षभरापासून भांडण सुरू आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करणवर निशाने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर करणने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन निशावर गंभीर आरोप केले. चुलत भाऊ रोहित सेठियासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याने केला. मुलगा कविशलाही भेटू देत नसल्याचं त्याने सांगितलं. आता निशाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने करणने केलेल्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिलं.

“आम्हा दोघांचं समुपदेशन करण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारलं की तुला तुझ्या मुलाला भेटायला आवडत नाही का? त्याने माझ्या मुलाची भेट घेतल्यास माझी काहीच हरकत नाही. पण त्यालाच भेटायचं नाहीये. त्याला मुलाचं संपूर्ण पालकत्व हवं आहे. त्याने डॉक्टरांना सांगितलं की त्याच्याकडे सध्या कामच नाही. अशा अशा परिस्थितीत तो मुलाची काळजी कशी घेईल? त्याला फक्त त्याच्या अहंकारासाठी मुलाचा वापर करायचा आहे”, असं निशा म्हणाली.

करणच्या आरोपांवर निशा पुढे म्हणते, “ऑगस्टमध्ये मी करणविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्याला फेब्रुवारी आणि मार्चमध्येही समन्स बजावण्यात आले होते. पण तो आला नाही. त्याला कायदा आणि न्याय व्यवस्थेविषयी अजिबात आदर नाही. तो घरात घुसून कविशला भेटू नये म्हणून मी त्याच्याविरुद्ध आदेश काढले होते. गेल्या जूनपासून कविशचा खर्च कसा उचलला जातोय, हे बघायलाही तो कधी आला नाही. तो त्याचाही मुलगा आहे. पण करणला त्याची अजिबात चिंता नाही.”

निशाच्या म्हणण्यानुसार घर तिच्या आणि करण दोघांच्या नावावर आहे. घरासाठी लोन घेतल्याने त्याची परतफेड दोघं मिळून करणार आहेत. त्यामुळे ती घराबाहेर पडू शकत नाही. मी पोटगीची मागणी केलेली नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

“माझं आणि करणचं नाते पूर्णपणे तुटलं आहे. आम्ही विभक्त झालो आहोत. करणचं ज्या मुलीशी अफेअर आहे, तिचं नावसुद्धा मी घेऊ इच्छित नाही. पण मी तिचं नाव, पत्ता आणि तिला पाठवलेले व्हॅलेंटाईन गिफ्ट्स, फ्लाईट तिकिटंही कोर्टात सादर केली आहेत,” असा खुलासा निशाने केला.

रोहित सेठियासोबतच्या नात्याबद्दल निशाने सांगितलं, “मी याविषयी कोणालाच उत्तर देणार नाही. आम्ही दोघं तरुण आहोत. ब्रेकअपनंतर मी माझ्या आयुष्यात काय करते त्याने कोणालाच फरक पडू नये. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो हा त्याचा विषय आहे. प्रत्येकाचे स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असतं आणि आम्ही एकमेकांना जबाबदार नाही.”