Aamir Khan Marriage : आमीर खान लवकरच चौथं लग्न…अभिनेत्यावर लव्ह जिहादचा आरोप, बडा नेता संतापला!

भाजपाचे नेते तथा हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे नितेश राणे यांनी आमीर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य केलं आहे. त्यांनी आमीर खानवर टीका केली आहे. त्याचे चित्रपट पाहायचे की नाही, हे हिंदूंनी ठरवावे, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

Aamir Khan Marriage : आमीर खान लवकरच चौथं लग्न...अभिनेत्यावर लव्ह जिहादचा आरोप, बडा नेता संतापला!
aamir khan marriage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 5:54 PM

Aamir Khan Marriage : बॉलिवूडमधील दिग्गज आणि आघाडीची अभिनेता आमीर खान याने नुकतेच तिसरे लग्न केले आहे. बऱ्याच वर्षांपासून गर्लफ्रेंड असणाऱ्या गौरी स्प्रॅटसोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. आपल्या राहत्या घरीच छोट्याशा कार्यक्रमात त्यांना हा विवाह केला आहे. विशेष विवाह कायद्याअंतर्गत गौरी आणि आमीर हे लग्नबंधनात अडकले आहेत. आमीर खानचे हे तिसरे लग्न आहे. दरम्यान, आता याच लग्नावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी तर आमीर खामला लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचं म्हटलं आहे.

लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचं का?

भाजपाचे नेते तथा हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे नितेश राणे यांनी आमीर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य केलं आहे. त्यांनी आमीर खानवर टीका केली आहे. त्याचे चित्रपट पाहायचे की नाही, हे हिंदूंनी ठरवावे, असे नितेश राणे म्हणाले आहेत. ‘समाजामध्ये अशा काही गोष्टी घडतात तेव्हा अशा लोकांकडे लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचं का? याबाबतची चर्चा वाढत चालली आहे. त्यामुळेच मी समस्त हिंदू समाजाला सांगतो की हिंदू समाजाने सावध राहावे. अशा पद्धतीच्या ब्रँड ॲम्बेसेडरपासून सावध राहायला हवे,’ असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच हे ब्रँड ॲम्बेसेडर कुठे दिसले की त्यांचे चित्रपट पाहायला हवे का? याबाबतही हिंदू समाजाने विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय शिरसाट यांनी केली नितेश राणेंची पाठराखण

नितेश राणे यांच्या भूमिकेला संजय शिरसाट यांनी पाठिंबा दिला. काही लोक आमीर खानला डोक्यावर घेऊन नाचत होते. याच लोकांना नितेश राणे यांनी प्रश्न विचारला आहे. एक, दोन तीन लग्न आता तो लवकरच चौथं लग्न करेल. यांना जो काही परवाना मिळालेला आहे, अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. दरम्यान, या राजकीय वक्तव्यांवर अद्याप आमीर खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us