Nora Fatehi | “ब्रेकअपनंतर इतकं नीच काम कोण करू शकतं?”, पुरुषांबद्दल नोरा फतेही झाली व्यक्त

तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात सध्या जॅकलिन आणि नोरा या दोघींची चौकशी सुरू आहे. या दोघींवर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे.

Nora Fatehi | ब्रेकअपनंतर इतकं नीच काम कोण करू शकतं?, पुरुषांबद्दल नोरा फतेही झाली व्यक्त
Nora Fatehi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2023 | 1:16 PM

मुंबई: 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची नावं चर्चेत आहेत. या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. मात्र नोराला जॅकलिनविषयी फार ईर्षा वाटायची, असा खुलासा सुकेशने एका पत्रात केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरा रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतर एखादी व्यक्ती सर्वांत नीच काम कोणतं करू शकते, याविषयीही तिने सांगितलं.

तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात सध्या जॅकलिन आणि नोरा या दोघींची चौकशी सुरू आहे. या दोघींवर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत नोराने कोणाचंही नाव न घेता आणि वैयक्तिक अनुभव आहे की नाही हे स्पष्ट न करता रिलेशनशिपमध्ये असलेल्या पुरुषांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

“एखादा पुरुष सतत गायब होत असेल तर हा सर्वांत मोठा इशारा आहे. तो जर तुमच्याशी आज आणि उद्या बोलत असेल आणि त्यानंतर पाच दिवस गायब असेल. पुन्हा तो तुमच्याशी पहिल्यासारखंच बोलू लागत असेल आणि पुन्हा तो गायब होत असेल, तर तो एकापेक्षा जास्त मुलींशी बोलत असल्याचं स्पष्ट समजतं”, असं ती म्हणाली.

नोराचा हा वैयक्तिक अनुभव आहे का असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “माहीत नाही. मी सहजच म्हणतेय.” याच मुलाखतीत नोराला ब्रेकअप केलेली सर्वांत नीच गोष्ट कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना ती म्हणाली, “आजपर्यंत मी अशी कोणती नीच गोष्ट केली नाही. पण मी तसं करण्याचा विचार एकदा केला होता. माझ्या मते ब्रेकअपनंतर सर्वांत नीच गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणं. ही सर्वांत नीच बाब असू शकते.”

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नोराने तिच्यावर असलेले आरोप फेटाळले. नुकतीच तिने दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात आपला जबाब नोंदवला. “माझी गर्लफ्रेंड झालीस तर मी तुला मोठं घर आणि आलिशान जीवन देईन असं आश्वासन सुकेशने मला दिलं होतं”, असा खुलासा तिने केला होता.