
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लव्हस्टोरी सर्वांना माहित आहे. आता ते पती पत्नी असून एकमेकांसोबत चांगले आयुष्य जगत आहेत. त्यांचे लग्न एका सुंदर नात्याचे उदाहरण मानले जाते.पण ऐश्वर्या बच्चनसोबत रिलेशनमध्ये येण्याआधी त्याचं नाव करिश्मा कपूरसोबत जोडले गेले होते. एवढंच नाही तर त्यांचे लग्नही ठरले होते. पण काही कारणास्तव त्यांचे नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही.
अभिषेकचे पहिले प्रेम हे ऐश्वर्या किंवा करिश्मा नव्हते तर दुसरीच बॉलिवूड अभिनेत्री होती.
पण हे कदाचित कोणाला माहित नसेल की अभिषेकचे पहिले प्रेम हे ऐश्वर्या किंवा करिश्मा नव्हते तर दुसरीच बॉलिवूड अभिनेत्री होती. त्याला ही अभिनेत्री एवढी आवडायची की तिच्यासोबत वेळ घालवणं त्याला फार पसतं होतं. आणि ही अभिनेत्री त्यांचे बालपणाचे प्रेम होते. ही अभिनेत्री म्हणजे 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान. अभिषेकने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे की त्याचे बालपणीचे प्रेम झीनत होत्या.
अभिषेक बच्चनने अभिनेत्रीला विचारला हा प्रश्न
याबद्दल बोलताना अभिषेक बच्चनने दिग्दर्शक साजिद खानशी झालेल्या संभाषणात एक रंजक किस्सा सांगितला. त्याने सांगितले की एकदा त्याचे वडील अमिताभ बच्चन ‘महान’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी काठमांडूला गेले होते. त्यावेळी अभिषेकही त्याच्यासोबत होता. यादरम्यान त्याची झीनत अमान यांच्याशी एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. चित्रपटाची झीनत अमिताभ यांच्या सहकलाकार होत्या.
जेव्हा एका रात्री झीनत त्यांच्या रुममध्ये जात असताना, लहान अभिषेकने त्यांना निरागसपणे विचारले होते की “मी तुझ्यासोबत झोपू का?” या प्रश्नाला झीनत हसल्या आणि गंमतीने म्हणाल्या, “तू आधी मोठा हो.”
झीनतने शहाणपणा दाखवला
अभिषेकने स्पष्ट केले की तो त्यावेळी खूप लहान होता आणि एकटा झोपायला तो घाबरत होता. त्याला देखील त्यावेळी ही भिती होती त्या त्याचा प्रश्न नेमका कसा घेतली पण झीनत यांनी त्याचं म्हणणं शांतपणे घेतलं. अभिषेकला अजूनही ही घटना आठवते. आणि आजही त्याला ही घटना आठवली की लाजल्यासारखं होतं.
अभिषेक बच्चनच्या कामबद्दल
अभिषेक बच्चनचा पुढचा चित्रपट “किंग” असणार आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.