AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना जया, ना रेखा, अमिताभ बच्चन यांची क्रश होती ही अभिनेत्री, सर्वांसमोर तिची चप्पल उचलली आणि….

ना जया बच्चन, ना रेखा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची क्रश होती ही अभिनेत्री. सर्वांसमोर उचलली होती तिची चप्पल.

ना जया, ना रेखा, अमिताभ बच्चन यांची क्रश होती ही अभिनेत्री, सर्वांसमोर तिची चप्पल उचलली आणि....
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 2:59 PM
Share

Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सौंदर्यसंपन्न आणि कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी 3 फेब्रुवारी रोजी, 88 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. प्यासा, कागज के फूल, गाइड यांसारख्या अजरामर आणि कल्ट क्लासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत.

वहीदा रहमान यांच्या अभिनयात नेहमीच साधेपणा, संयम आणि खोल भावनिक अभिव्यक्ती दिसून येत असे. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांच्या डोळ्यांना अक्षरशः सुखावणारा होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी साकारलेल्या तरुण, निरागस आणि चंचल भूमिका प्रेक्षकांना विशेष भावल्या आणि त्या काळात त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

तमिळनाडूमध्ये जन्म आणि संघर्षाची सुरुवात

वहीदा रहमान यांचा जन्म तमिळनाडू राज्यात झाला. त्यांचे वडील महानगरपालिकेचे कमिशनर होते. लहानपणापासूनच वहीदांना नृत्याची प्रचंड आवड होती. त्या घरी आरशासमोर नाचत असत. हे पाहून त्यांचे वडील प्रेमाने त्यांना पागल असे म्हणत असत.

वहीदा या भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत. स्टेजवर नृत्य करत असतानाच त्यांना चित्रपटसृष्टीबद्दल माहिती मिळाली. वडिलांच्या एका मित्राने, जे तेलुगू चित्रपटसृष्टीतील निर्माता होते, त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मात्र सुरुवातीला वहीदांचे वडील यासाठी तयार नव्हते.

दुर्दैवाने, वहीदा 13–14 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर निर्माता त्यांच्या आईकडे गेले आणि वहीदांना चित्रपटात काम करू देण्याची विनंती केली. घरच्या परिस्थितीमुळे वहीदांच्या आईने परवानगी दिली. जरी वहीदांचे मन प्रामुख्याने नृत्याकडेच होते.

अमिताभ बच्चन यांची आदरभावनेची आठवण

वहीदा रहमान यांची फॅन फॉलोइंग प्रचंड होती. अमिताभ बच्चन हे देखील त्यांच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा शेअर केला होता, जो आजही चर्चेत आहे. ते म्हणाले होते, ‘रेशमा और शेरा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक सीन होता, ज्यात सुनील दत्त आणि वहीदा जी यांना वाळवंटात नंगे पाय बसायचं होतं. इतकं तापमान होतं की आमच्यासाठी चपला घालूनही वाळूत उभं राहणं अशक्य होतं. दिग्दर्शकाने ब्रेक म्हटल्यावर मी क्षणाचाही विलंब न करता वहीदा जींच्या चपला उचलल्या आणि त्यांच्या दिशेने धावलो.’ यानंतर अमिताभ बच्चन यांनी वहीदा रहमान यांच्यासोबत ‘त्रिशूल’, ‘अदालत’ आणि ‘नमक हलाल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

वहीदा रहमान म्हणजे केवळ एक अभिनेत्री नव्हे तर संयम, शिस्त, कलेची निष्ठा आणि सुसंस्कृततेचे प्रतीक आहेत. त्यांच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...