‘एक नंबर घमेंडी…’, अभिनेत्रीने स्टेजवर येताच केलं असं काही; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

एक बॉलिवूड अभिनेत्री अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या शोमध्ये तिला शो स्टॉपर म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तिने तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मात्र तिच्या एका कृतीमुळे तिला प्रचंड ट्रोलही केलं जात आहे.

एक नंबर घमेंडी..., अभिनेत्रीने स्टेजवर येताच केलं असं काही; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल
Nusrat Bharucha Trolled
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 7:03 PM

बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री जिने तिच्या कामाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे. अलिकडेच ती एका फॅशन इव्हेंटमध्ये शो स्टॉपर होती. तेव्हा तिने स्टेजवर जे काही कृत्य केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा.

नुसरत भरुचाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल

नुसरत भरुचाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. यामध्ये ती शो स्टॉपर म्हणून स्टेजवर येते पण तेव्हाच ती एका मुलीला मागे ढकलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

व्हिडिओमध्ये, नुसरत मागून स्टेजवर येते आणि समोर मुलींच्या टीमला पाहून ती पुढे जाऊन उभी राहते. यानंतर ती दोन मुलींना पुढे बोलावते. त्या दोघेही डिझायनर होत्या असंच त्या व्हिडीओत दिसून येत आहे. यानंतर, ती पोझ देते आणि पुढे जाते. हा व्हिडिओ फिल्मी मंत्रा मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


नुसरतची ही कृती पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून ट्रोल 

या व्हिडिओमध्ये नुसरतची ही कृती पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं आहे की ती त्या मुलीला मागे घेऊन स्वत: पुढे गेली आहे. नुसरत एक अभिनेत्री असल्याने ती अॅटीट्यूड दाखवत आहे असं काही लोक म्हणत आहेत. काहीजण असे म्हणत आहेत की “ती शोस्टॉपर आहे, ती आणखी काय करू शकते”, तर बरेच लोक तिच्या समर्थनार्थ बोलत आहेत.

“ती फक्त तिचे काम करत आहे….”

या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत, एकाने लिहिले आहे की,”प्रेरणा आणि आत्मविश्वास देणे हे प्रत्येक चांगल्या अभिनेत्रीचे काम आहे.” दुसऱ्याने लिहिले आहे या “अभिनेत्रीचा अॅटीट्यूड खूप जास्त आहे, प्रत्येकाने सर्वांचा विचार केला पाहिजे” तर या व्हिडिओमुळे अनेक लोक अभिनेत्रीला अहंकारी म्हणत आहेत. एकाने लिहिले, “ती फक्त तिचे काम करत आहे, ती कुठे उभी राहणार, ती शो स्टॉपर आहे”. एकंदरीत नुसरतच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.