
दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या ‘ओ रोमियो’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शनिवारी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘ओ रोमियो’च्या टीझरमध्ये अॅक्शन, स्टाइल आणि स्वॅग यांचा भरणा होता. परंतु यात काही आक्षेपार्ह भाषाही वापरण्यात आली आहे. टीझरमधील काही सीन्समध्ये सर्रास शिवीगाळ ऐकायला मिळते. अभिनेता शाहिद कपूर तर सुरुवातीलाच त्या अंदाजात बोलताना दिसला. परंतु प्रेक्षकांना खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या तोंडीही त्या शिव्या ऐकायला मिळाल्या. सध्या असे संवाद सर्वसामान्य असले तरी फरीदा जलाल यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यांच्या भूमिकेला असे संवाद दिल्याने प्रेक्षक अवाक् झाले आहेत.
‘ओ रोमियो’च्या टीझरमध्ये एक सीन आहे, जेव्हा फरीदा जलाल प्रेमाचा अर्थ समजावत असतात. या संवादाच्या शेवटी त्या शिवी देतात. हा सीन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या या सीनवर स्पष्ट नाराजी कोणी व्यक्त केली नसली तरी सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांच्या या सीनचे क्लिप्स व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘बॉलिवूडमध्ये माझ्या बालपणीच्या आठवणीच उद्ध्वस्त केल्या आहेत. यांनी तर सर्वांत प्रेमळ फरीदा जलाल यांच्या तोडींची शिव्यांचा डायलॉग दिला’, असं एकाने लिहिलं. तर ‘फरीदा जलाल यांनी कॅमेरासमोर शिवी देणं हे माझ्या 2026 च्या बिंगो कार्डमध्ये नव्हतंच’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
Bollywood has ruined by childhood memories!
It has even managed the sweetest Farida Jalal to abuse!!#ORomeo pic.twitter.com/rNhOzZxVSy— Gagan Chawla (@toecrushrzzz) January 10, 2026
Farida Jalal swearing on camera was not on my 2026 bingo card 😭#ORomeo pic.twitter.com/r7fXmMaVcj
— ANMOL JAMWAL (@jammypants4) January 10, 2026
‘ओ रोमियो’ हा चित्रपट येत्या 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये शाहिद कपूर, फरीदा जलाल यांच्यासोबतच तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, विक्रांत मेस्सी आणि नाना पाटेकर यांच्या भूमिका आहेत. या टीझरची सुरुवात शाहिदच्या एका दृश्याने होते. बोटीवर ‘छोटू’ म्हणून हाक मारताना त्याचा संयम सुटतो. काऊबॉय हॅट, काळी बनियान, शरीरावर टॅटू, ज्वेलरी असा त्याचा हटके लूक यात पहायला मिळतो. टीझरमध्ये नाना पाटेकर, दिशा पटानी, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया आणि अविनाश तिवारी यांच्या पात्रांचीही झलक दाखवण्यात आली आहे. याशिवाय चित्रपटात अरुणा इराणी, हुसेन दलाल, रेश लांबा आणि राहुल देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.