Orry : सारा नरकयातना भोगत असताना मी तिच्यासोबत होतो, ऑरीचा मोठा खुलासा; म्हणाला, अमृताने मला शिवीगाळ…

Orry On Sara Ali Khan : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ऑरीनं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Orry : सारा नरकयातना भोगत असताना मी तिच्यासोबत होतो, ऑरीचा मोठा खुलासा; म्हणाला, अमृताने मला शिवीगाळ...
| Updated on: Nov 03, 2026 | 4:04 PM

सोशल मीडिया सेन्सेशन आणि रिॲलिटी शो स्टार ऑरी केवळ एंटरटेनर नाही, तर तो स्पष्टवक्ता देखील आहे. ऑरी नेहमीच आपलं मत मोकळेपणानं मांडतो. ऑरीनं पुन्हा एकदा अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांच्यासोबतच्या आपल्या भांडणावर उघडपणे चर्चा केली. ऑरीनं सांगितलं की, अमृता सिंगनं त्याला शिवीगाळ केली होती आणि एका कठीण काळात त्याला सोडून दिलं होतं.

ऑरीनं सांगितलं काय घडलेलं?

Loading...

अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या पॉडकास्टवर ऑरीनं सारा अली खानसोबतच्या आपल्या वादाबद्दल सांगितलं. त्यानं खुलासा केला की, जेव्हा त्याला साराची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा सारानं त्याला साथ दिली नाही. एका गेम सेगमेंटदरम्यान, ऑरीने सोशल मीडियावर सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांना अनफॉलो करण्यामागचं कारण सांगितलं. ऑरी म्हणाला, ‘साराची आई मला खूप ओरडायची, म्हणून मी तिलाही अनफॉलो केलं. तुम्ही मला विचाराल की, ही खोटी मैत्री आहे का? सारा माझ्या बालमैत्रिणीसारखी आहे. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि त्यानंतर १० वर्षे मित्र राहिलो.’

‘प्रत्येक कठीण काळात मी तिच्या पाठीशी उभा राहिलो. जेव्हा ती एका मोठ्या केसमध्ये अडकली होती, तेव्हा आम्ही गोव्यात होतो आणि मी तिला पाठिंबा दिला. पण आयुष्यात जेव्हा मला तिची गरज होती, तेव्हा ती गायब झाली. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं. सारानं माझी विचारपूस करण्यासाठी एकदाही फोन केला नाही. जेव्हा ती नरकयातना भोगत होती आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं, तेव्हा मी तिला आधार दिला. सगळे मला तिला सोडून देण्यास आणि यात न पडण्यास सांगत होते. पण मी तिची आई आणि भावाची काळजी घेत तिच्या पाठीशी उभा राहिलो.’

‘मग काळ बदलला, आणि तिला फक्त एकदाच मला तिची गरज होती, पण तिनं साधा फोनही केला नाही. या वर्षी जेव्हा मी तिला अनफॉलो केलं, तेव्हा मला वाटलं की, जर मी आज तिच्याशी मैत्रीचं नाटक केलं, तर तिनं जे काही केलं, किंवा तिच्या आईने मला केलेला शिवीगाळ, किंवा तिनं सगळ्यांना माझ्याबद्दल सांगितलेल्या वाईट गोष्टी, हे सगळं खरं वाटेल…म्हणून मी तिच्याशी मैत्री तोडली. सारानं माझी कधीच माफी मागितली नाही. मी मनात राग धरतो, आणि तोही अनेक वर्षे. मी प्रत्येकाचा हिशोब चुकता करतो.’ असंही ऑरी म्हणाला.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ऑरी म्हणाला होता की, ‘२०२१ मध्ये, मला अमृता सिंगमुळे त्याला मानसिक त्रास झालेला. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us