प्रियांका चोप्रा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली, पती सोबत असताना अचानक… Video समोर

Priyanka Chopra News : अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका अपघातातून बतावल्याची माहिती समोर येत आहे. पती निक जोनस सोबत असताना अचानक काय झालं? व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्रा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली, पती सोबत असताना अचानक... Video समोर
| Updated on: Mar 16, 2026 | 1:14 PM

Priyanka Chopra News: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं केल्यानंतर हॉलिवूड पर्यंत पोहोचली आणि यंदाच्या वर्षी भारताची प्रतिनिधी म्हणून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून भूमिका बजावली. पण पुरस्कार सोहळ्यापूर्वी अभिनेत्रीचा अपघात झाला असता, या अपघातातून प्रियांका थोडक्यात बचावली आहे. पती आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस सोबत असताना प्रियांका थोडक्यात बचावली… सध्या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचताना प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, प्रियांका गोल्फ कार्टमध्ये पुढे बसते, तर निक आणि अन्य दोन प्रवासी मागे बसतात. जेव्हा महिला चालक गोल्फ कार्ट पुढे सरकवते, तेव्हा कार्टचं नियंत्रण सुटतं आणि एका बाजूला अधिक लोड येतो.. जेथे प्रियांका बसलेली आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की जर गाडी डावीकडे जास्त झुकली असती तर प्रियांका चोप्रा मोठ्या अपघाताला बळी पडू शकली असती. पण असं काहीही झालं नाही. गोल्फ कार्टमध्ये वजन जास्त झाल्याचं लक्षात येताच, एक व्यक्ती उतरते आणि दुसऱ्या गोल्फ कार्टमध्ये बसते… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

सांगायचं झालं तर, जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याचं, ऑस्करचं 98 वे संस्करण संपलं आहे. यंदाच्या वर्षी हॉलिवूड सिनेमे सिनर्स आणि वन बॅटल आफ्टर अनदर यांसारख्या सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाला. या दोन सिनेमांनी अनेक श्रेणींमधील पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत.

पण ऑस्कर 2026 मध्ये भारतात कोणताच सिनेमा पोहोतला नाही. 2033 मध्ये दोन ऑस्कर जिंकल्यानंतर, भारताचे कोणतेच सिनेमे ऑस्कर पर्यंत पोहोचले नाही. पण अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने भारताची प्रतिनिधी म्हणून पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून भूमिका बजावली.. ज्यामुळे प्रियांका हिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

2026 बद्दल सांगायचं झालं तर, यावर्षी ऑस्करसाठी भारतातून होमबाउंड, कांतारा चॅप्टर 1, तन्वी द ग्रेट आणि टुरिस्ट फॅमिली यासारख्या सिनेमांची निवड करण्यात आली होती. पण, त्यापैकी कोणताच सिनेमा नामांकन प्रक्रियेपर्यंत पोहोचला नाही. भारतीय-अमेरिकन दिग्दर्शिका गीता गंधबीर यांचे दोन सिनेमे ऑस्करसाठी नामांकित झाले होते, परंतु दोन्ही सिनेमांना अंतिम टप्प्यात माघार घ्यावी लागली.

Follow Us