Mirzapur 3 Release Date : प्रतिक्षा संपली, रिलीज डेट जाहीर, ‘या’ तारखेला ‘कालीन भैया’ ‘गुड्डू पंडित’ येणार आमने-सामने

Mirzapur 3 Release Date : बहुचर्चित 'मिर्झापूर' वेब सीरीजच्या तिसऱ्या सीजनची रिलीज डेट समोर आलीय. याआधी 'मिर्झापूर' वेब सीरीजचे पहिले दोन सीजन हिट ठरले होते. कालीन भैया मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काय करणार? त्याच उत्तर तिसऱ्या सीजनमध्ये मिळणार आहे.

Mirzapur 3 Release Date : प्रतिक्षा संपली, रिलीज डेट जाहीर, या तारखेला कालीन भैया गुड्डू पंडित येणार आमने-सामने
मुंबई | 21 मार्च 2024 : मिर्झापूर... ओटीटीवरची प्रचंड लोकप्रिय सिरीज... या सिरीजमधील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. लवकरच या सिरीजचा तिसरा भाग प्रसारित होणार आहे.
| Updated on: Jun 11, 2024 | 1:35 PM

काही वेब सीरीज प्रचंड लोकप्रिय ठरतात. अशा वेब सीरीज त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशा वेब सीरीजचा पहिला सीजन संपल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीजनची आतुरतेने प्रतिक्षा असते. या वेब सीरीजचा दुसरा किंवा तिसरा सीजन कधी येणार? यासाठी प्रेक्षकांकडून सतत सर्च सुरु असतो. ‘मिर्झापूर 3’ अशाच वेब सीरीज पैकी एक आहे. ॲमेझॉन प्राइमवर या वेब सीरीजचा पहिला सीजन तुफान यशस्वी ठरला होता. त्यानंतर दुसरा सीजन आला आणि आता तिसरा सीजन कधी येणार? याची प्रतिक्षा होती. अखेर रिलीज डेट जाहीर झालीय. ‘मिर्झापूर 3’ ची प्रेक्षकांना प्रचंड क्रेझ आहे. मेकर्सनी, चाहत्यांनी आतुरता अधिक ताणून धरण्यासाठी काही ना काही हिंट दिले होते. आधी ‘मिर्झापूर 3’ च्या मेकर्सकडून काही हिंट देण्यात येत होत्या. आता ‘मिर्झापूर 3’ ची कन्फर्म रिलीज डेट समोर आलीय.

पंकज त्रिपाठी आणि अली फजल याची ‘मिर्झापूर 3’ मध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सीजनमध्ये ‘मुन्ना भैया’ म्हणजे दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) दिसणार नाही. ‘गुड्डू पंडित’ ने मागच्या सीजनमध्ये गोळ्यांनी त्याच्या देहाची चाळण केली होती. पण कालीन भैया बचावले. कालीन भैया म्हणजे पंकज त्रिपाठी. ‘मिर्झापूर’ च तख्त कोण राखणार? याची लढाई तिसऱ्या सीजनमध्ये सुद्धा सुरु राहणार आहे.


किती तारखेला रिलीज होणार?

आता ‘कालीन भैया’ आणि ‘गुड्डू पंडित’ यांच्यामध्ये बाजी कोण मारतो? याची उत्सुक्ता आहे. कालीन भैया मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काय करणार? पुन्हा एकदा रक्तरंजित, खुनी संघर्ष कसा असले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर 5 जुलैला मिळणार आहेत. ‘मिर्झापूर’ वेब सीरीजचा तिसरा सीजन 5 जुलैला येणार आहे.