Aashram सीरिजमध्ये दाखवलेल्या बाबा निराला यांच्या भव्य वाड्यात तुम्हीही राहू शकता, जाणून घ्या किती खर्च येईल?

| Updated on: Jun 05, 2022 | 11:43 AM

प्रकाश झा दिग्दर्शित या सीरिजचं शूटिंग मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये करण्यात आलं आहे. याच ठिकाणी सीरिजची संपूर्ण टीम शूटिंगसाठी दोन महिने थांबली होती. 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये दाखवलेली ही जागा 18 एकरमध्ये पसरलेली आहे.

Aashram सीरिजमध्ये दाखवलेल्या बाबा निराला यांच्या भव्य वाड्यात तुम्हीही राहू शकता, जाणून घ्या किती खर्च येईल?
Bobby Deol in Aashram
Image Credit source: Twitter
Follow us on

अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रमुख भूमिका असलेल्या ‘आश्रम’ (Aashram 3) या वेब सीरिजचा तिसरा सिझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही सीरिज खूप लोकप्रिय झाली असून तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आश्रम’मध्ये बॉबीने बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. भक्तीच्या जाळ्यात लोकांना अडकवून चुकीचं काम करणारा हा ढोंगी बाबा असतो. या सीरिजमध्ये बाबा निराला (Baba Nirala) यांचा भव्य आश्रम दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तुम्हीसुद्धा या आश्रममध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 3 जूनपासून तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. ‘आश्रम 3’मध्ये अदिती पोहणकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन, श्रिधा चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

‘आश्रम’चं शूटिंग कुठे पार पडलं?

प्रकाश झा दिग्दर्शित या सीरिजचं शूटिंग मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये करण्यात आलं आहे. याच ठिकाणी सीरिजची संपूर्ण टीम शूटिंगसाठी दोन महिने थांबली होती. ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये दाखवलेली ही जागा 18 एकरमध्ये पसरलेली आहे. हा एक राजवाडा असून भोपाळचा शेवटचा नवाब हमिदुल्ला खान यांनी 1920 मध्ये त्यांची मोठी मुलगी आबिदा हिच्यासाठी बांधला होता. या राजवाड्यात अनेक खोल्या असून तुर्कीच्या सुलतानाने भेट म्हणून दिलेली मशिदीची प्रतिकृतीही या महालात आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

राखण्याचा खर्च किती?

या पॅलेसचं आता हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. पॅलेसमध्ये आलिशान खोल्या, चायनीज रेस्टॉरंट आणि इतर उत्कृष्ट दर्जाच्या सेवा आहेत. याठिकाणी एक मोठी बागदेखील आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह कौटुंबिक सहलीसाठी येऊ शकता. ऑफ सीझनमध्ये या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी खोलीचं भाडं जवळपास 7 हजार रुपये आहे. इतर वेळी हीच किंमत 10 हजार रुपयांपर्यंत जाते. यामध्ये नाश्त्याचाही समावेश असतो.