सासू – सूनेच्या मालिकांना मागे टाकत, पाकिस्तानी शो रचतोय विक्रम, ‘अबु बकर’ने प्रेक्षकांच्या मनाक केलं घर!

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त पाकिस्तानी शोची तुफान चर्चा रंगली आहे. ज्यामधील अबु बकर नावाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. आता पाकिस्तानी शोची तुलना भारतीय मालिकांसोबत होत आहे.

सासू - सूनेच्या मालिकांना मागे टाकत, पाकिस्तानी शो रचतोय विक्रम, अबु बकरने प्रेक्षकांच्या मनाक केलं घर!
| Updated on: Nov 21, 2026 | 9:03 AM

संध्याकाळी 7 वाजले की भारतीय घरांमध्ये मालिका सुरु होता. पण आता प्रत्येक मालिकेतील सासू – सूनेच्या भांडणांचा अनेकांना कंटाळा आला आहे. सांगायचं झालं तर, भारतात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी शोची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांना आता ‘अनुपमा’, ‘तुलसी’ या मालिकांचा कंटाळा आहे. आता अनेकांनी आपला मोर्चा पाकिस्कानी शोच्या दिशेने वळवला आहे. भारतातील असंख्य लोक यूट्यूबच्या माध्यमातून पाकिस्तानी शो पाहात आहेत. पाकिस्तानी शोमधील अनेक भूमिका देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अबु बकर या भूमिकेची चर्चा रंगली आहे. जो विशेषतः तरुणींमध्ये हिट आहे.

पाकिस्तानी ड्रामाच्या ज्या अबु बकरची सध्या चर्चा होत आहे, तो ‘दर-ए-निजात’ (Dar-e-Nijaat) नावाच्या शोमधील एक पात्र आहे. शोमधील अबु बकर याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. शोमध्ये अबु बकर हिच भूमिका मुख्य आहे आणि प्रेक्षकांना देखील आवडत आहे. ते लोकांना इतकं आवडत आहे की त्याला ‘ग्रीनेस्ट फ्लॅग’ (greenest flag) असा टॅग दिला जात आहे.

Loading...

पाकिस्तानी ड्रामातील अबु बकर का आवडतोय?

पाकिस्तानी ड्रामा ‘दर-ए-निजात’ मधील अबु बकर या पात्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं, तर त्याबद्दल सोशल मीडियावर प्रेक्षकांनी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. या भूमिकेने थेट जेन झींच्या मनावर ताबा मिळवला आहे… लोकांचं असं देखील म्हणणं आहे की, अबु बकर हे प्रत्येक मुलींच्या स्वप्नातील राजकुमारासारखं पात्र आहे. जाणून घ्या अबु बकर बद्दल लोकांचं काय म्हणणं आहे.

युजर्सचे म्हणणं आहे की अबु बकरचे पात्र खूपच चांगल्या मनाचं आहे. आपल्या पत्नीचा आदर कसा करायचा, हे त्याला माहीत आहे. बोलायला, प्रेम करायला त्याला सर्व काही येते आणि तो खूपच ‘ड्रीमी’ आहे. एवढंच नाही तर, युजर्सच्या मते, यामध्ये अबु बकरची आई आहे, जी ‘ड्रीम सासू’ची भूमिका साकारत आहे; आजकाल मुलींची सासूकडून जशी अपेक्षा असते, तसाच हा रोल आहे.

अबु बकरच्या पात्राबद्दल एका युजरने म्हटले आहे की, यामध्ये दाखवलं आहे तशी मुलं आजकाल अजिबात नसतात. तो स्वप्नातील राजकुमारासारखा आहे आणि खूपच हळव्या मनाचा आहे. तर एकाने म्हटले की, भारतात टीव्हीवर फक्त सासू-सुनेचे वाद पाहायला मिळतात. एकाच सीनवर अनेकदा फोकस करून दाखवले जातं, पण पाकिस्तानी ड्रामामध्ये तसं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us