AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy : 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड…सौंदर्यवतीच्या मोहापायी नेवी मधल्या ट्रेनीची देशासोबत गद्दारी का?

Indian Navy : नौदलातील प्रशिक्षणार्थी पाकिस्तानी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय. 20 हजार रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी होईल.

Indian Navy : 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड...सौंदर्यवतीच्या मोहापायी नेवी मधल्या ट्रेनीची देशासोबत गद्दारी का?
honey trap
| Updated on: Nov 21, 2026 | 8:47 AM
Share

नौदलातील प्रशिक्षणार्थी पाकिस्तानी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये कार्यरत 23 वर्षीय प्रशिक्षणार्थीला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बंटी रामप्रकाश मीणा असे आरोपीचे नाव असून डॉकयार्डचे दोन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचा संशय आहे. ‘Nattu 3’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानस्थित गुप्तचर ऑपरेटिव्हशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. डॉकयार्डमधील 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड आणि एका प्रसंगी लाईव्ह लोकेशन शेअर केल्याचा आरोप आहे. आरोपीने 16 जहाजे विशाखापट्टणममध्ये असल्याचे सांगितल्यानंतर जहाजांची माहिती शेअर केल्याचा तपास सुरु आहे.

हनी ट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय. 20 हजार रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी. कोलाबा पोलिसांकडून सोशल मीडिया, चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी. आरोपी २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत. Official Secrets Act, IT Act आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी नौदलात कायमस्वरूपी कर्मचारी नसून प्रशिक्षणार्थी होता.

पाकिस्तानी हँडर्लसशी कनेक्ट असल्याचा संशय

आरोपी बंटी रामप्रकाश मीणा हा राजस्थानच्या करौली जिल्ह्याचा रहिवाशी असून त्याने नेवल डॉकयार्ड आणि भारतीय नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची माहिती सोशल मीडियावर अपलोड केल्याचा संशय आहे. आरोपीची सोशल मिडिया अकाऊंट पाकिस्तानी हँडर्लसशी कनेक्ट असल्याचा संशय आहे. इन्स्टाग्रामवरुन संवेदनशील सुरक्षा ठिकाणांबद्दलची माहिती शेअर झाल्याचं मुंबई पोलिसांच्या सोशल मिडिया डिजिटल लॅबला समजलं.

तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपीचं अकाऊंट शोधून काढलं व त्याला अटक केली. आरोपीला 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आरोपीच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अप अकाऊंटची तपासणी करत आहेत. त्याचा मोबाइल फोन जप्त करुन सीम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुद्धा चौकशी सुरु आहे.

Follow Us
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया