
Dhurandhar : दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (Dhurandhar) सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर अनेकांनी सिनेमावर टीका देखील केली आहे. काही देशांमध्ये तर सिनेमा बॅन देखील करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, सिनेमा पाकिस्तान विरोधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. याच दरम्यान, पाकिस्तानमध्ये सिनेमाचं कौतुक होत असल्याचं चित्र दिसत आहे. 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे… ते सुद्धा पाकिस्तानमध्ये… रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि संजय दत्त या कलाकाराचं देखील समिक्षकांकडून कौतुक होत आहे… पाकिस्तानमधील लोक सिनेमाचं कौतुक करत आहेत आणि सिनेमात दाखवलेल्या ल्यारी परिसराने पाकिस्तानही आश्चर्यचकित झाला आहे.
धुरंधरमध्ये दाखवलेला ल्यारी परिसर प्रत्यक्षात पंजाबमधील लुधियाना येथील खेडा गावात चित्रित करण्यात आला होता, परंतु सिनेमा पाहिल्यानंतर खरंच ल्यारी परिसर असल्याचे दिसून येत आहे. सिनेमात दाखवलेल्या ल्यारी परिसराने पाकिस्तानला धक्का बसला आहे.
कराची येथील कर वकील आणि लेखक सादिक सुलेमान यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत धुरंधर सिनेमाचं कौतुक केलं आहे, ‘मी कराचीचा नागरिक आह … मला हा सिनेमा पहायचा होता कारण मला वाटलं होतं की, हा सिनेमा देखील इतर बॉलिवूड सिनेमांसारखाच मूर्खपणाचा असेल पण सिनेमात पाकिस्तानचे काही भाग ज्या पद्धतीने दाखवले आहेत ते पाहून मी थक्क झालो आहे.’
‘मी माझ्या आई – वडिलांनी मी सिनेमातील काही सीन दाखवले आणि ते आश्चर्यचकित झाले. माझे आई – वडील 1960 पासून ल्यारीला लागून असलेल्या मिठादर आणि खरदर भागात राहत होते. त्यांना सिनेात दाखवलेला ल्यारी खरा वाटला.’
आदित्य धरचं कौतुक करत सादिक सुलेमान म्हणाले, ‘सर्वात जास्त कौतुक तर मी दिग्दर्शक आणि पूर्ण रिसर्च टीमचं करेल… कराची येथील छोट्या – छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे… ज्यामुळे सिनेमा अधिक जवळचा वाटू लागला आहे… जुन्या शहराच्या परिसराचे, विशेषतः ल्यारीच्या आसपासच्या परिसराचं ते पुनर्निर्माण होतं.’
सुलेमान पुढे म्हणाले, ‘अक्षय खन्ना निर्दयी रेहमान दरोडेखोराच्या भूमिकेला जबरदस्त न्याय दिला आहे, तर संजय दत्तचा चौधरी असलमच्या भूमिकेतला अभिनय मला आवडला…. ‘ 2010 मध्ये पोलिसातील एका मित्राच्या वडिलांमार्फत मी खऱ्या चौधरी अस्लमला थोडक्यात भेटलो. 2010 पासून मी या महत्त्वाच्या खटल्याच्या सर्व सुनावणी आणि प्रकरणाचे तपशील फॉलो करत आहे.” असं देखील वकील सादिक सुलेमान म्हणाले.