Jo Bache Hain Sang Samet Lo: पाकिस्तानला चांगलाच दणका! पहिल्याच सीरिजवर बंदी, नेमकं काय झालं?

Jo Bache Hain Sang Samet Lo: ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहून पाकिस्तानच्या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही नवी सीरिज भारतात दिसणार नाही. पाकिस्तानची 8 वर्षांची मेहनत पाण्यात जाणार आहे.

Jo Bache Hain Sang Samet Lo: पाकिस्तानला चांगलाच दणका! पहिल्याच सीरिजवर बंदी, नेमकं काय झालं?
Jo Bache Hain Sang Samet Lo
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 1:51 PM

पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स वेब सीरीज ‘जो बचे हैं संग समेट लो’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सर्वत्र चर्चा रंगली होती. आता भारत सरकारने या सीरिजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. थेट या सीरिजवर बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला चेतावणी देत ८ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आपल्या अॅडव्हायझरीचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. या अॅडव्हायझरीनुसार पाकिस्तानमध्ये बनलेला कोणताही सिनेमा किंवा वेब सीरीज भारतात प्रदर्शित करता येणार नाही.

मंत्रालयाला अलीकडे अशा तक्रारी मिळाल्या होत्या की ही पाकिस्तानी सीरीज भारतात रिलीज होऊ शकते, त्यानंतर सरकारने नेटफ्लिक्सला जून २०२५ मध्ये केलेल्या त्याच आश्वासनाची आठवण करून दिली आहे, ज्यात प्लॅटफॉर्मने भारतात कोणताही पाकिस्तानी कंटेंट उपलब्ध न करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

Loading...

भारतात दाखवला जाणार नाही पाक कंटेंट

मंत्रालयाने नेटफ्लिक्सला सांगितले आहे की त्यांनी जूनमध्ये केलेल्या आपल्या आश्वासनावर कायम राहावे आणि पाकिस्तानमध्ये बनलेला कंटेंट भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देऊ नये.

‘जो बचे हैं संग समेट लो’ ही नेटफ्लिक्सची पहिली ओरिजिनल पाकिस्तानी वेब सीरीज आहे. ही सीरीज जागतिक स्तरावर ४ डिसेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. सीरीज जगभरातील १९१ देशांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, आता भारतात सीरीज दाखवली जाणार नाही. या सीरीजवरून मोठा वाद सुरु आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

ही सीरीज २ पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे. पहिल्या पार्टमध्ये ५ एपिसोड आहेत आणि एकूण १३ एपिसोड रिलीज होण्याची अपेक्षा आहे. या सीरीजमध्ये ३ जनरेशनच्या ६ लव्ह स्टोरीज दाखवल्या जातील. सीरीजमध्ये अहमद रजा मीर, इकरा अजीज, फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर, सनम सईद, हमजा अली अब्बासी, माया अली, बिलाल अशरफ, नादिया जमील, समीना अहमद यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. अलीकडे या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर भारतात अजूनही पाहता येत आहे. ही सीरीज बनवण्यात ८ वर्षे लागली आहेत. तिचे शूटिंग २०० दिवस चालले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us