AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडे केराटिन ट्रीटमेंट विसरा; घरीच केसांसाठी भेंडीच्या जेलचा असा करा वापर, मिळेल स्मूद लुक

केस मऊ, चमकदार आणि स्मूद दिसावेत यासाठी अनेक जण महागड्या केराटिन ट्रीटमेंटचा पर्याय निवडतात. मात्र, भेंडीच्या जेलचा वापर करूनही घरी केसांची काळजी घेता येते. जाणून घ्या, भेंडीपासून केराटिन हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत.

महागडे केराटिन ट्रीटमेंट विसरा; घरीच केसांसाठी भेंडीच्या जेलचा असा करा वापर, मिळेल स्मूद लुक
| Edited By: | Updated on: Nov 26, 2026 | 1:48 PM
Share

हिवाळ्यात केवळ त्वचेवरच नाही, तर केसांवरही हवामानाचा परिणाम होतो. थंडीमुळे केस कोरडे, निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. अशा वेळी केसांचा मऊपणा आणि चमक टिकवण्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्पा किंवा केराटिन ट्रीटमेंट करून घेतात. मात्र, यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या भेंडीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क तयार करू शकता. भेंडीच्या जेलमुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास आणि केस मऊ, चमकदार बनण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया हा हेअर मास्क बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत.

भेंडीच्या जेलपासून हेअर मास्क कसा बनवायचा?

सर्वप्रथम १० ताज्या भेंड्या स्वच्छ धुऊन त्यांचे लहान तुकडे करून घ्या. एका भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यामध्ये भेंडीचे तुकडे टाका. हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या. पाणी घट्ट आणि चिकट जेलसारखे दिसू लागल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीने भेंडीचे जेल वेगळे करून घ्या. तयार झालेल्या जेलमध्ये एक चमचा एलोवेरा जेल किंवा बदामाचे तेल मिसळा. अशा प्रकारे तुमचा होममेड हेअर मास्क तयार होईल.

केसांना भेंडीचा हेअर मास्क कसा लावायचा?

तयार केलेला मास्क केसांच्या मुळांपासून ते संपूर्ण लांबीपर्यंत व्यवस्थित लावा. हा मास्क केसांवर किमान ४० मिनिटे राहू द्या. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. शाम्पू केल्यानंतर केसांना थोडे कंडिशनरही लावू शकता.

केसांना काय फायदे होतात?

भेंडीच्या जेलमुळे केसांचा रुक्षपणा कमी होण्यास आणि केस मऊ व सिल्की बनण्यास मदत होऊ शकते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळण्यासही मदत होते. तसेच केस अधिक मॅनेजेबल होतात आणि ते विंचरणे सोपे जाते. महागड्या हेअर ट्रीटमेंटऐवजी घरच्या घरी हा मास्क तयार करून केसांची निगा राखता येते.

भेंडीचा हेअर मास्क वापरताना कोणती काळजी घ्यावी?

हा मास्क केसांना किंवा टाळूला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहा. त्यामुळे जळजळ किंवा खाज यांसारखी समस्या होत नाही ना, हे समजेल. पहिल्यांदा हा मास्क वापरत असाल, तर तो ४० ते ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळ केसांवर ठेवू नका. तसेच आठवड्यातून फक्त एकदाच या मास्कचा वापर करा.

Follow Us
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण