Pallavi Purohit : इतकी लोकसंख्या असताना त्यात भर घालायला नको…प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, मुलांना जन्म न देण्याचं सांगितलं कारण

Tv Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत मुलांना जन्म न देण्याचं कारण सांगितलं आहे.

Pallavi Purohit : इतकी लोकसंख्या असताना त्यात भर घालायला नको...प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, मुलांना जन्म न देण्याचं सांगितलं कारण
| Updated on: Nov 28, 2026 | 8:10 PM

अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पुरोहित सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली असतानाही पल्लवी आणि तिचा पती प्रशांत पुरोहित यांनी मूल न होण्याचा निर्णय घेतला आहे. आई न होण्यामागचं कारण सांगताना तिनं केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘स्वतःचं मूल असतं तर मी स्वार्थी झाले असते’, असं ती म्हणाली आहे.

काय म्हणाली पल्लवी पुरोहित?

Loading...

‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी पुरोहित म्हणाली की, ‘मला आणि माझ्या पतीला मुलं नको आहेत. या देशात आधीच इतकी लोकसंख्या असताना आपण त्यात आणखी भर घालायला नको, असं आम्हाला वाटलं. एकूणच आपल्याकडे आधीच खूप जास्त लोकसंख्या आहे. सध्याच्या काळात आई-वडिलांना मुलांची नाही, तर मुलांना आई-वडिलांची गरज आहे. मला मुलं हवी असतील तर अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना मी दत्तक घेऊन त्यांचं आयुष्य सुधारू शकते. मी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकते आणि चांगल्या सुविधा देऊ शकते.

 


 

‘स्वतःचं बाळ असतं तर मी स्वार्थी झाले असते आणि सगळं त्याच्यासाठीच केलं असतं’ असं अभिनेत्री म्हणाली. करोना काळात तिनं अशा एका संस्थेबरोबर काम केलं, जी करोनामुळे आई-वडील गमावणाऱ्या मुलांची यादी करत होती. ‘मला वाटलं आम्हाला मुलं असती आणि मला किंवा माझ्या पतीला काही झालं असतं तर आमच्या मुलांचं काय झालं असतं, ते कुठे गेले असते? आताचं जसं वातावरण आहे, प्रदुषण वगैरे गोष्टी बघता मला बाळ जन्माला घालणं योग्य वाटत नाही’ असं पल्लवी पुरोहितने सांगितलं.

मुलं खूप आवडतात, पण तरीही स्वतःचं बाळ नकोय. म्हातारपणी आधार हवा म्हणून मुल जन्माला घालणं हा स्वार्थीपणा आहे. आजकाल मुलं कायम आई-वडिलांबरोबर राहत नाहीत, असंही पल्लवी शेवटी म्हणाली.

दरम्यान, पल्लवी पुरोहितच्या कामाबद्दल सांगायचं तर तिला ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून‘ या मालिकेनं प्रसिद्धी मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us