Neha Gadre : एका प्रोजेक्टसाठी बिकीनी घालायला नकार दिला म्हणून बाबा मला ओरडले, मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा
बाबांविषयी बोलताना पुढे ती म्हणाली, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आलं होतं मला तेव्हा त्यात बिकीनी घालायची होती. आणि मी कर्न्फटेबल नाही म्हणून त्या प्रोजेक्टला नाही म्हटल .बाबांना हे मी सांगितलं, तेव्हा बाबा मला ओरडले, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

ही अभिनेत्री चांगल करिअर सोडून परदेशात गेली. त्या अभिनेत्रीने करिअरवर पाणी सोडलं आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. अश्या अनेक बातम्या आपण ऐकतो . एकेकाळी मराठी मालिका विश्व गाजवणारी एक मराठी अभिनेत्री सुद्धा परदेशात स्थायिक झाली होती. पण ती आता पुन्हा मायदेशी परत आली आहे आणि पुन्हा काम करायला सज्ज देखील झाली आहे, आणि ती म्हणजे अभिनेत्री नेहा गद्रे.
ऑस्ट्रेलियातून आल्यावर नेहाने कामाला देखील सुरूवात करण्याची तयारी दाखवली आहे. म्हणजेच काय तर नेहाला पुन्हा आपल्याला सिनेमा नाहीतर मालिकामध्ये पाहता येणार आहे. नुकतीच तिने राजश्री मराठीला एक मुलाखतही दिली आहे. ज्यात तिने बिकीनी न घातल्यामुळे तिचे बाबा तिला ओरडल्याचा एक किस्सा सांगितला, ती म्हणाली ” मला या इंस्डस्ट्रीसाठी आई बाबांचा खूप सपोर्ट होता. माझ्या आईची इच्छा होती की मी अभिनेत्री व्हावी.
बाबांविषयी बोलताना पुढे ती म्हणाली, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आलं होतं मला तेव्हा त्यात बिकीनी घालायची होती. आणि मी कर्न्फटेबल नाही म्हणून त्या प्रोजेक्टला नाही म्हटल .बाबांना हे मी सांगितलं, तेव्हा बाबा मला ओरडले, असे नेहा म्हणाली
नेहा म्हणाली माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं. माझे आई बाबा ओपन माइंडेड आहेत हे मला माहित होतं. पण इतके फ्रि असतील हे मला माहित नव्हता, ते म्हणाले नेहा हे तुझं काम आहे. तू जर असचं सहज घालून गेलीस तर मी ओरडीन एक वडिल म्हणून , पण हे तुझ काम आहे, तुझं हे फिल्ड आहे. तुला माहित आहेत काय गोष्टी करायच्या आहेत काय नाही. त्यामुळे प्रोफेशनलिझममध्ये या गोष्टी आणत जाऊ नकोस, आणि मी त्या कारणामुळे प्रोजेक्ट नाकारल्याने बाबा खूप अपसेटा झाले होते. पण मला आई बाबांकडून प्रचंड सपोर्ट मिळाला आहे.म्हणूनच मी या इंस्डट्रित तरले इतकी वर्षे. असे नेहा म्हणाली.
नेहा गद्रेनं 2 मार्च 2019 रोजी ईशान बापट याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती पतीसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला. जवळपास सात वर्षे ती ऑस्ट्रेलियात राहत होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी 2025 रोजी नेहा आणि ईशान यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलाचं आगमन झालं. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात नवा आनंद आला. मात्र, या संपूर्ण प्रवासात कुटुंबापासून दूर राहण्याची खंतही त्यांना जाणवत होती आणि म्हणूनच तिने पुन्हा भारतात यायचा निर्णय घेतला.
