Adinath Kothare : प्रियांका चोप्राच्या मते आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ सिनेमा फ्लॉप, अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, तुला लाज…
Priyanka Chopra On Ramayana Movie : प्रियांका चोप्रानं 'रामायण' सिनेमाला फ्लॉप म्हणणाऱ्या व्हिडिओला लाईक केलं असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे आणि साई पल्लवी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या 23 दिवसांतच भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं जवळपास 1,800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्वजण सिनेमाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. तिनं ‘रामायण’ला फ्लॉप म्हणणाऱ्या एका रीलला लाईक केलं आहे.
अलीकडेच, कंटेंट क्रिएटर, कॉपीरायटर आणि पटकथा लेखक विश्वन चौधरीनं इन्स्टाग्रामवर एक रील अपलोड केली होती. यामध्ये त्यांनं ‘रामायण’च्या कमाई आणि बजेटवर चर्चा करत चित्रपटाच्या यशाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या इन्फ्लुएन्सरनं आपल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाला फ्लॉप म्हटलं होतं. प्रियांका चोप्रासह अनेक युझर्सनी त्याच्या रीलला लाईक केलं.
View this post on Instagram
नंतर विश्वन चौधरीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात प्रियांका चोप्रानंही त्याच्या ‘रामायण’ सिनेमावर आधारित रीलला लाईक करून पाठिंबा दर्शवल्याचं दिसत होतं. विश्वननंही रील लाईक केल्याबद्दल प्रियांकाचे आभार मानले. प्रश्न असा आहे की, प्रियांकानं हे मुद्दाम केलं की चुकून लाईक केलं. एका युझरनं कमेंट करत लिहिलं की, ‘प्रियांकानं ही रील का लाईक केली? ती तिच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटाबद्दल इन्सिक्योर आहे का?’ दुसऱ्यानं लिहिलं, ‘प्रियांका चोप्राला याची किंमत मोजावी लागेल…’ आणखी एका युझरनं लिहिलं, ‘प्रियांका चोप्रा, तू हा व्हिडिओ का लाईक केलास? तुला लाज वाटायला हवी.’


दरम्यान, ‘रामायण’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन आणि लारा दत्ता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
तसेच, प्रियांका चोप्राचा चित्रपट, ‘वाराणसी’, एप्रिल 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती महेश बाबू सोबत दिसणार आहे. 1300 कोटींचा बिग बजेट असलेला हा चित्रपट एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे.
