AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काम पूर्ण करायची अन् लंच ब्रेक घ्यायलाही करायची टाळाटाळ; कंपनीने तरुणीला थेट कामावरून काढलं

एका तरुणीला काम पूर्ण करून वेळेआधी घरी जाणे महागात पडलं आहे. कंपनीने या तरुणीला थेट कामावरून काढलं आहे. कंपनीच्या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.

काम पूर्ण करायची अन् लंच ब्रेक घ्यायलाही करायची टाळाटाळ; कंपनीने तरुणीला थेट कामावरून काढलं
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 8:11 PM
Share

दररोज ऑफिसमध्ये वेळेत काम पूर्ण केल्यानंतर लवकर घरी निघणे एका कर्मचार्‍याला महागात पडलं आहे. कंपनीने एका महिला कर्मचाऱ्याची हकालपट्टी केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कंपनीच्या कारवाईवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. खरंतर ही तरुणी काम वेळेत करत होती. परंतु ऑफिसच्या वेळेत लंच ब्रेक घेत नव्हती. ती डेस्कवर जेवण करायची. त्यानंतर ऑफिसमधून 6 वाजण्याऐवजी 5 वाजताच घरी जाण्यास निघाृयची. त्यामुळे तरुणीला कंपनीने थेट घरचा रस्ता दाखवला आहे. आता या तरुणीला कंपनीने पाठवलेलं कथित टर्मिनेशन इमेल व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर एक कथित टर्मिनेशन इमेल प्रचंड व्हायरल झालं आहे. इमेलमध्ये संबंधित कर्मचारी 1 ते 2 या वेळेत लंच ब्रेक घेत नव्हती. त्याऐवजी डेस्कवर जेवण करायची. लंच ब्रेकचा वेळ वाचवून लवकर काम आटोपून घरी जात होती. ईमेलमध्ये आणखी एक उल्लेख करण्यात आला आहे की, ही तरुणी 6 वाजता ऑफिस बंद होण्याच्या एका तासाआधी घरी जायची. या तरुणीच्या वर्तनावर कंपनीने आक्षेप घेतला. इमेलमध्ये दावा करण्यात आला की, या तरुणीच्या सवयींमुळे इतर कर्मचाऱ्यांवर परिणाम होत आहे. बहुतांश कर्मचारी या तरुणीचं अनुकरण करत होते’. कथित ईमेलमध्ये स्पष्ट लिहिलंय की, लंच ब्रेकमध्ये काम पूर्ण केले म्हणजे कर्मचारी लवकर ऑफिसवरून जाऊ शकत नाही. ऑफिसमध्ये काम जरी पूर्ण केले, तरी आठ तासांची ड्युटी पूर्ण करावी लागेल. कंपनी कर्मचाऱ्यांसाठी नियम ठरवते. त्याचे कर्मचाऱ्यांनी पालन केले पाहिजे. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्याची तातडीने हकालपट्टी करत असल्याचे स्पष्ट केले.

तरुणीला मिळालेल्या कथित इमेलवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत आहे. काहींनी थेट कंपनीच्या नियमावर बोट ठेवलं आहे. कर्मचाऱ्याला आधी एक वार्निंग द्यायला हवी होती. तिला कंपनीचे नियम सांगितले पाहिजे. थेट कंपनीतून हकालपट्टी काढणे योग्य नव्हे, असा युक्तिवाद काही नेटकरी करत आहे. तर काहींनी थेट कर्मचाऱ्याच्या वागणुकीवर टीका केली आहे. ऑफिसची घरी जाण्याची वेळ सायंकाळी ६ वाजताची ठरलेली आहे. तिने लंच ब्रेकमध्ये काम पूर्ण केले असले, तरी तिला सायंकाळी 5 वाजता ऑफिसमधून जाण्याचा अधिकार नाही. खरंतर लंच ब्रेक न घेता ऑफिसमधून लवकर जाणे कायद्यात बसत नसल्याचे काहींनी म्हटलं आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!