AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Rule Social Media: सरकारचा डिजिटल स्ट्राईक! ती एक चूक आणि Facebook, Insta, WhatsApp सह Telegram वर आता थेट कारवाई, तुम्ही असा सावध

IT Rule 2021 strike : आता सोशल मीडियावर सरकारची करडी नजर राहणार आहे. सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला पहिला चाप लागला आहे. माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021 चा बडगा आता उगारल्या जाणार आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

IT Rule Social Media: सरकारचा डिजिटल स्ट्राईक! ती एक चूक आणि Facebook, Insta, WhatsApp सह Telegram वर आता थेट कारवाई, तुम्ही असा सावध
आयटी नियम २०२१Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 31, 2026 | 10:09 AM
Share

Social Media Platform: केंद्र सरकारने डिजिटल जगातील बड्या खेळाडूंवर फास आवळला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021, IT Rules 2021 मध्ये आणखी नवीन आणि कडक नियम जोडले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना मोठा दणका बसला आहे. युझर्स आणि कंटेंट यादरम्यान दलाल म्हणून काम करणे या प्लॅटफॉर्मला भोवणार आहे. सरकारच्या नवीन नियमांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्रामसह गुगल आणि युट्यूबचे धाबे दणाणले आहेत. या कंपन्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे.

युझर्स आणि कंटेंट यांच्या दरम्यान अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मध्यस्थाची भूमिका निभावतात. याठिकाणी लोक काही पोस्ट करतात आणि समोरील व्यक्तीला ती दिसते. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,टेलिग्राम हे मॅसेजिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर गुगल आणि युट्यूब सारखे सर्च आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्म, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे ई-कॉमर्स, नेटफ्लिक्स, प्राईम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मही या परीघात येणार आहे. त्यांना कडक नियमांचा सामना करावा लागणार आहे.

वृत्त आणि समाज माध्यमांवरील कंटेंटबाबत कडक धोरण

एक मोठा बदल नियम 8 मध्ये करण्यात आला आहे. आता बातमी आणि ताज्या घडामोडींसंबंधीत कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. आता हे नियम केवळ बातमी प्रकाशित करण्यापर्यंत मर्यादित नसतील. तर त्या सोशल मीडियावर पण करडी नजर असेल जिथे अशा बातम्या अथवा कंटेंट पोस्ट करण्यात येतो. म्हणजे एखादा युझर्स अशी बातमी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,टेलिग्रामवर फॉरवर्ड करत असेल अथवा फेसबुकवर पोस्ट करत असेल तर त्यावर नजर असेल. चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती असेल तर या प्लॅटफॉर्मवरही जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

युझर्सला पण बसेल फटका

याचा दुसरा अर्थ आता युझर्सला पण असा कंटेंट फॉरवर्ड करणे अथवा तो शेअर करणे धोक्याचे ठरणार आहे. तुम्ही डोळेझाक करून असा कंटेंट पुढे पाठवत असाल आणि त्याविषयी कुणी तक्रार केली तर मग या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. अशी कारवाई वाढतील आणि त्याचा मनस्ताप युझर्सला सहन करावा लागेल. त्यामुळे युझर्सला सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंटेंट शेअर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?