
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंजाबी सिनेमांमधून स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या एका 32 वर्षीय अभिनेत्याचं निधन झालं आहे. एका छोट्याश्या चुकीमुळे आणि सवयीमुळे अभिनेत्याने प्राण गमावले आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्याचं निधन झालं आहे, त्या अभिनेत्याचं नाव सिंग भंगू (Randeep Singh Bhangu Passes Away) असं आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…
पोलिसांच्या प्राथमिक तपासात भंगू हा काही दिवसांपासून नियमितपणे दारूचे सेवन करत होता. दारूच्या नशेत असताना त्याने शेतात मोटारीवर ठेवलेली कीटकनाशकाची बाटली दारू समजून प्यायल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपण कीटकनाशक प्यायलो आहोत असं समजल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होतो. रणदीप भंगूला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केलं.
रणदीप भंगू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्याला एक चूक आणि सतत दारू पिण्याची सवय महागात पडली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणदीप भंगू याच्या निधनाची चर्चा रंगली आहे.
पंजाबी फिल्म अँड टीव्ही ॲक्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस मलकित सिंग रौनी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रणदीप याने दारूचे सेवन वाढवले होते. त्याला कशाचा तरी ताण होता. भंगूचे अकाली निधन हे पंजाबी चित्रपटसृष्टीसाठी दु:खद आहे.
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी देखील अभिनेत्याचे प्राण वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण डॉक्टरांना यश मिळालं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर यावर पुढील कारवाई केली जाईल. असं देखील सांगण्यात येत आहे.