
प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. ज्यांनी गँग्स ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटांमधून स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. पण खऱ्या आयुष्यात त्यांची प्रतिमा त्यांच्या रील लाईफपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, पंकज आणि त्यांची पत्नी मृदुला यांची भेट 1993 मध्ये कॉलेजमध्ये असताना एका लग्नात झाली होती. त्यावेळी पहिल्या नजरेतच ते मृदुला यांच्या प्रेमात पडले.

मृदुला यांनाही पंकज त्रिपाठी आवडू लगाले होते. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी अखेर लग्न केलं. या जोडप्याला 2006 मध्ये एक मुलगी झाली. पंकज त्रिपाठीची पत्नी मृदुला यांचा साधेपणा सहजता त्यांच्या फोटोंमध्येही नक्कीच दिसत आहे. त्यांचे फोटो तुमचे नक्कीच मन जिंकतील.

एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आठवणी ताज्या केल्या आणि सांगितले की जेव्हा ते आणि त्यांची पत्नी मृदुला एकमेकांशी बोलत असत तेव्हा मोबाईल फोन नव्हते. ते दररोज कॅन्टीनमध्ये बसून लँडलाइन फोनवर मृदुलाच्या कॉलची वाट पाहत असत. त्या काळातील प्रेम वाट पाहणे आणि विश्वासावर आधारित होते असंही ते म्हणाले आहेत.

जेव्हा पंकज त्रिपाठी यांना विचारण्यात आले की यशस्वी विवाह आणि नातेसंबंधाचे रहस्य काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की, "आमच्या काळात फारशी तंत्रज्ञान नव्हते. आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान नव्हते. जेव्हा आम्ही घराबाहेर पडायचो तेव्हा आमच्यासाठी एकमेव तंत्रज्ञान म्हणजे आम्ही ट्रेन, बस, टेम्पो, ऑटो किंवा बाईक असा कशानेही प्रवास करायचो."

पंकज त्रिपाठी म्हणाले, "आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. त्यावेळी फक्त लँडलाईन फोन होते. मग जेव्हा मोबाईल फोन आले तेव्हा इतर अनेक गोष्टी त्यांच्यासोबत आल्या. हो, सोशल मीडिया, पेमेंट अॅप्स आणि इतर सर्व अॅप्स देखील मोबाईल फोनसोबत आले. आता तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा 24 तास एक भाग आहे. पूर्वी असे नव्हते."

ते पुढे म्हणाले, "मला आठवतंय जेव्हा मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. मला रात्री 8 वाजता कॅन्टीनच्या लँडलाइनवर मृदुलाचा फोन यायचा. संपूर्ण दिवस त्या एका फोनची वाट पाहण्यातच जायचा." पंकज म्हणाले, "त्या वेळी कॉल आमच्यासाठी आहे हे कळण्यासाठी कोणताही रिंगटोन किंवा कॉलर आयडी नव्हता. त्यामुळे आम्हाला दिवसभर अशी आशा असायची की कॉल रात्री 8 वाजता नक्कीच येईल."

आता लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही हे जोडपं आजही एकमेकांबद्दल तेवढंच प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतं.