
मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे सध्या तूफान चर्चेत आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये यांच्या शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आता अवघ्या काही तासांमध्येच परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा हे लग्न बंधनात अडकतील. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते हे गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी आता 24 सप्टेंबर रोजी यांचा शाही विवाहसोहळा पार पडेल. काही महिन्यांपासून यांच्या लग्नाची तयारी बघायला मिळाली.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा हा अत्यंत खास लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री हे उदयपूरमध्ये कालच सहकुटुंब सहभागी झाले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यामध्येही अरविंद केजरीवाल सहभाही झाले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा दिल्ली येथे पार पडला. यावेळी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघेही अत्यंत खास लूकमध्ये दिसले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नाच्या एक दिवस अगोदर खास पार्टीचे आयोजन लीला पॅलेसमध्ये केले. मेहंदी आणि संगीत देखील धमाकेदार पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या पार्टीतील आता काही व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसतायंत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या पार्टीत पंजाबी सिंगर नवराज हंस गाणे म्हणताना दिसतोय. या पार्टीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे अत्यंत जवळचे लोक उपस्थित असल्याचे दिसतंय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे काही कार्यक्रम हे लीला पॅलेजमध्ये होतील तर काही कार्यक्रम ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. पाहुण्यांसाठी अत्यंत शाही जेवण देखील असणार आहे. सानिया मिर्झा ही या लग्नामध्ये उपस्थित झाल्याचे सांगितले जातंय. प्रियांका चोप्रा लग्नामध्ये येणार की, नाही याबद्दल अजून काही स्पष्ट झाले नाहीये. साखरपुड्याला प्रियांका चोप्रा ही उपस्थित होती.