AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशिक्षित आणि मूर्ख मानसिकता ! न्यू मदर्सच्या ट्रोलिंगवर परिणीती चोप्राचा संताप; म्हणाली – माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही

सलमान खानने 'बिग बॉस'मध्ये महिलांच्या बॉडी शेमिंगविरोधात आवाज उचलल्यानंतर, अभिनेत्री परिणीती चोप्रानेही या मुद्द्यावर रोखठोक मत मांडले आहे. नव्या मातांच्या शरीरातील नैसर्गिक बदलांवरून ट्रोल करणाऱ्यांना तिने 'अशिक्षित आणि विचित्र' म्हटले.

अशिक्षित आणि मूर्ख मानसिकता ! न्यू मदर्सच्या ट्रोलिंगवर परिणीती चोप्राचा संताप; म्हणाली - माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही
| Updated on: Sep 23, 2026 | 3:00 PM
Share

टीव्हीवरचा लोकप्रिया रिॲलिटी शो असलेल्या ‘बिग बॉस 20’ च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खानने (Salman Khan) महिला विशेषत: नुकत्याच आई झालेल्या महिलांच्या बॉडी शेमिगविरोधात, ट्रोलिंग विरोधात आवाज उठवला त्याने ट्रोलर्सना चांगलंच फटाकरलं. आता या चर्चेला नवं वळण मिळालं आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी य़ा मुद्यावर बोलले, काही सलमानालही सपोर्ट केला. आता अभिनेत्री परिणीती चोप्रानेही (Pariniti chopra) याच मुद्द्यावर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. गेल्या वर्षी, ऑक्टोबर 2025 मध्ये परिणीतीने मुलाला जन्म दिला. आता तिने या ट्रोलिंगच्या मुद्यावर प्रतिक्रिया देत प्रेग्नन्सीनंतर महिलांच्या शरीरावर अश्लील किंवा अनावश्यक कमेंट करणाऱ्या लोकांना ‘अशिक्षित, मूर्ख आणि विचित्र’ म्हणत जोरदार टीका केली. एखाद्या महिलेने एका नव्या जीवाला जन्म दिला आहे, त्यामुळे तिच्या शरीरात बदल होणे स्वाभाविक आहे. मात्र काही लोकं स्ट्रेच मार्क्सना वाईट मानतात, असं म्हणत तिने बरंच सुनावलं.

अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवात अभिनेत्री कतरिना कैफने हजेरी लावली. तिचे लूक्स, वाढलेलं वजन यावरून लोकांनी उलटसुलट कमेंट्स केल्या, अनेकांनी तिच्यावरही टीकाही करत बॉडी शेमिंग केलं. त्यानंतर सलमान खानने कतरिनाची बाजू घेत ट्रोलर्सना फटकारलं. बिग बॉसच्या सेटवर तो खूपच संतापला होता. त्याने टीकाकारांना बरंच काही सुनावलं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत परिणीतीला सलमानच्या याच वक्तव्याबद्दल आणि कतरिनाच्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

अनोळखी लोकं माझ्याबद्दल काय बोलतात, फरक पडत नाही

PTIला दिलेल्या मुलाखतीत परिणीती चोप्राने यावर स्पष्टपणे बोलली. सोशल मीडियावर होणाऱ्या अशा चर्चांकडे मी फारसं लक्ष देत नाही असं ती म्हणाली. ‘ मी त्याकडे लक्ष देत नाही, कारण मी ते पाहतच नाही. माझ्यासोबत असं काही घडले तरी मला त्याबद्दल बहुतेक वेळा माहितीच नसते, कारण मी सोशल मीडियावर फारसा वेळ घालवत नाही. आणि मला जरी ते कळलं तरी मला त्याने काहीच फरक पडत नाही ’ असं तिने नमूद केलं. ‘मी माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या वेळेबद्दल, माझं कुटुंब , माझे मित्र-मैत्रिणी आणि जीवनाश खूप खूप प्रामाणिक आहे. अनोळखी लोक माझ्याबद्दल काय बोलतात, याने मला काहीही फरक पडत नाही. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. या निरर्थक गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही’ अशा शब्दांत परिणीतीने ट्रोलिंगचा परिणा होत नसल्याचं नमूद केलं.

महिलांच्या शरीरावर चर्चा करणं विचित्र

पुढे बोलताना परिणीतीने विशेषतः नुकत्याच आई झालेल्या महिलांचा उल्लेख केला. ती म्हणाली, ‘ महिलांच्या, विशेषतः एखाद्या नवजात बाळाला जन्म देणाऱ्या महिलांच्या शरीरावर चर्चा केली जाते, ही गोष्ट मला खूपच विचित्र वाटते. असं का करतात हेच मला कळत नाही. खरं सांगायचं तर मला त्याचं कारणच समजत नाही. एखाद्या महिलेने मुलाला जन्म दिला असेल आणि त्यामुळे तिच्या शरीरावर काही खूण किंवा बदल दिसत असतील, तर त्याकडे नकारात्मक पद्धतीने का पाहिलं जातं ? ही एक सुंदर आठवण किंवा खूण नाही का?’ असा खडा सवाल तिने विचारला..

‘नऊ महिन्यांत मुलाला जन्म देण्यासाठी शरीरात हे बदल होणं आवश्यक असतं. मग त्याबद्दल चर्चा का केली जाते? जेव्हा मी नुकत्याच आई झालेल्या एखाद्या महिलेला पाहते, तेव्हा मी म्हणते, अरे वा! तू मुलाला जन्म दिलास? ही किती सुंदर गोष्ट आहे. बाळ कसं आहे? मी याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहते.’ असंही परिणीतीने नमूद केलं. वजनासारख्या शुल्लक गोष्टीबद्दल कोणी इतकं निगहेटीव्ह कसं बोलू शकतं ? याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या व्यक्तीचं स्वत:चं काही आयुष्य नाहीये, ना योग्य शिक्षण आणि सर्वात महत्वाचम म्हणजे त्याच्याकडे साधी माणुसकीची जाणही नाही. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींसाठ वेळ नाहीये आणि (इतर) कोणत्याही महिलेने त्या व्यक्तीचं बोलणं ऐकण्यात एक क्षणही वाया घालवू नये असं मला वाटतं, अशा रोखठोक शब्दात परिणीतीने या सर्व मुद्यावर मत व्यक्त केलं.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?