Pathaan Trailer: ‘अब पठान के वनवास का टाइम खत्म’, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ॲक्शन पॅक्ड ट्रेलर पाहिलात का?

'पठाण'मध्ये जबरदस्त ॲक्शनचा भरणा; धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते म्हणाले 'बॉलिवूडला दुर्लक्ष करू शकता पण शाहरुखला नाही..'

Pathaan Trailer: अब पठान के वनवास का टाइम खत्म, शाहरुख-दीपिकाच्या पठाणचा ॲक्शन पॅक्ड ट्रेलर पाहिलात का?
Pathaan Trailer: 'अब पठान के वनवास का टाइम खत्म', शाहरुख-दीपिकाच्या 'पठाण'चा ॲक्शन पॅक्ड ट्रेलर पाहिलात का?
Image Credit source: Youtube
| Updated on: Jan 10, 2023 | 11:28 AM

मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शनचा भरणा पहायला मिळतोय. शाहरुख आणि दीपिकासोबत अभिनेता जॉन अब्राहमने या ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘पठाण’ हा चित्रपट विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादादरम्यान शाहरुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता होती. आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाविषयी आतुरता निर्माण झाला आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख दमदार कमबॅक करतोय. पोस्टरवरील त्याचे सिक्स-पॅक ॲब्स पाहूनच हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असेल असा अंदाज होता. त्या ॲक्शन पॅक्ड चित्रपटाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते.

या ट्रेलरची सुरुवातच जबरदस्त ॲक्शन सीनने होते. ‘पठाण’मध्ये शाहरुख आणि दीपिका हे सैनिकांच्या भूमिकेत आहेत. देशाला वाचवण्यासाठी या दोघांकडे एक मोठं मिशन सोपवण्यात आलं आहे. हे मिशन पूर्ण करण्यात दोघं यशस्वी ठरतात का, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

पहा ट्रेलर-

‘पठाण’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादामुळे त्याच्या प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही संवादांवर आणि दृश्यांवर कात्री चालवली, असंही कळतंय.

सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याने याआधी सलाम नमस्ते, ता रा रम पम, बचना ए हसिनों, अंजाना अंजानी, बँग बँग, वॉर यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.