Uorfi Javed | उर्फी जावेद हिचे शरीर बांधले चक्क साखळीने, अभिनेत्रीसोबत घडले तरी नेमके काय?, लोक हैराण

उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही निर्माण केलीेय. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिचे शरीर बांधले चक्क साखळीने, अभिनेत्रीसोबत घडले तरी नेमके काय?, लोक हैराण
| Updated on: Sep 07, 2023 | 4:50 PM

मुंबई : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही निर्माण केलीये. उर्फी जावेद (Uorfi Javed) कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे लोक थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील बऱ्याच वेळ देतात. उर्फी जावेद हिच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच महिला या रस्त्यावर उतरल्या होत्या. मध्यप्रदेशमध्ये महिला उर्फी जावेद हिच्या विरोधात घोषणा देखील देताना दिसल्या. याचे अनेक फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये धमाकेदार गेम खेळताना देखील दिसली.

उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाहीये. नेहमीच उर्फी जावेद ही अतरंगी कपड्यांमध्ये दिसते. नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या नव्या लूकचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण यावेळी अत्यंत अतंरगी स्टाईलमध्ये उर्फी जावेद दिसतंय.

उर्फी जावेद हिने आपले शरीर हे साखळ्यांनी बांधले आहे. समोरून आणि मागून तिने आपल्या शरीराला साखळ्या बांधल्या आहेत. इतकेच नाही तर चक्क मंकी कॅपने आपला चेहरा देखील उर्फी जावेद हिने झाकला आहे. आता उर्फी जावेद हिचा हा नवा लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

यासोबतच उर्फी जावेद हिने आपल्या केसांची वेणी तयार केलीये. या लूकमध्ये अनेक पोजमध्ये उर्फी जावेद हिने फोटोशूट केले आहे. उर्फी जावेद हिचा हा अतंरगी लूक चाहत्यांना फार काही आवडला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, या उर्फी जावेदच्या डोक्यामध्ये अशा कल्पना नेमक्या कुठून येतात?

दुसऱ्याने लिहिले की, ही काय करते हिलाच माहिती. उर्फी जावेद हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात अडकते. मात्र, या वादांचा फार काही परिणाम हा कधीच उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. सोशल मीडियावर आपले खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते.