अमिताभ बच्चन यांच्या नातीवर लोकांची सडकून टिका, ऐश्वर्या राय हिच्यामुळे नव्या नवेली नंदा ही…

नव्या नवेली नंदा ही बॉलिवूडमध्ये धमाका करणार नाहीये. मात्र, असे असले तरीही नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते. आपल्या शोमध्ये मोठे खुलासे करताना अमिताभ बच्चन यांची नात कायमच दिसते. नव्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग देखील बघायला मिळते.

अमिताभ बच्चन यांच्या नातीवर लोकांची सडकून टिका, ऐश्वर्या राय हिच्यामुळे नव्या नवेली नंदा ही...
Aishwarya Rai and Navya Naveli Nanda
| Updated on: Sep 25, 2024 | 1:21 PM

नुकताच पॅरिस फॅशन वीक 2024 हा पार पडलाय. यावेळी बॉलिवूडच्या कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. विशेष म्हणजे या पॅरिस फॅशन वीकमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही देखील पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पोहोचली होती. आलिया भट्ट ही देखील जबरदस्त लूकमध्ये दिसली. आता नुकताच आलिया भट्ट हिने पॅरिस फॅशन वीक 2024 चे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. दुसरीकडे ऐश्वर्या राय हिने देखील पॅरिस फॅशन वीकचे फोटो शेअर केले. लोक दोघींच्याही फोटोवर कमेंट करत आहेत.

पॅरिस फॅशन वीक 2024 मुळे आता अमिताभ आणि जया बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन हिची लेक नव्या नवेली नंदा लोकांच्या निशाण्यावर झालीये. एक कमेंट करणे नव्याला चांगलेच महागात पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोक सतत नव्याला खडेबोल सुनावत आहेत. आलिया भट्ट हिने पॅरिस फॅशन वीक 2024 चे काही फोटो शेअर केले. त्याच पोस्टवर नव्या नवेली नंदा हिने कमेंट केली.

आलिया हिच्या फोटोवर कमेंट करून तिचे काैतुक करताना नव्या नवेली नंदा ही दिसली. मात्र, लोकांना नव्याचे हे वागणे अजिबातच पटले नसल्याचे दिसत आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, बहीण मामीचे पण कधीतरी काैतुक कर. दुसऱ्याने लिहिले की, मामीच्या फोटोवर कमेंट करायचे हिला कधीच समजत नाही. तिसऱ्याने लिहिले की, मामीकडे ही दुर्लक्ष करते.

सतत नव्यासाठी लोक कमेंट करताना दिसत आहेत. हेच नाही तर मध्यंंतरी चर्चा आली होती की, अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्याने ऐश्वर्या राय ही चांगलीच नाराज आहे. हेच नाही तर श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहत असल्याचेही ऐश्वर्या हिला अजिबातच पटत नाही.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. श्वेता बच्चन हिच्यामुळेच अभिषेक आणि ऐश्वर्या हे घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत आणि यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये. ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडल्याचे देखील सांगितले जाते.