वहिदा रहमान यांनी जीव धोक्यात घालून शूट केलेलं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, वेळ काढून ऐकतात लोक
वहिदा रहमान यांनी आपल्या जीवाची पूर्वा न करता शूट केलेलं सर्वात सुपरहिट गाणं. 61 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर करतंय राज्य. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही लोक वेळ काढून ऐकतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी केवळ मनोरंजन करत नाहीत तर आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देतात. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या देव आनंद आणि वहीदा रहमान यांच्या ‘गाइड’ चित्रपटातील ‘आज फिर जीने की तमन्ना है’ हे गाणं त्यापैकीच एक आहे. स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारे हे गाणं आजही लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, अनेक महिलांसाठी हे गाणं स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते.
‘गाइड’ चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद यांनी केले होते. आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात देव आनंद यांनी राजू, तर वहीदा रहमान यांनी रोजीची भूमिका साकारली होती. रोजी ही स्वतःचे अस्तित्व आणि नृत्याविषयीची आवड ओळखण्याचा प्रयत्न करणारी महिला आहे. त्या काळातील सामाजिक बंधने आणि पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा मार्ग निवडण्याचा तिचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
लता मंगेशकरांचा आवाजामुळे ठरलं सुपरहिट
‘आज फिर जीने की तमन्ना है’ हे गाणं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी गायले आहे. या गाण्याला संगीतकार सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) यांनी संगीत दिले तर गीतकार शैलेंद्र यांनी त्याचे बोल लिहिले. लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजामुळे आणि अर्थपूर्ण शब्दांमुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली.
या गाण्यात वहीदा रहमान यांचे नृत्यही विशेष लक्षवेधी ठरते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, हावभाव आणि नृत्यातून रोजीच्या मनातील बदल स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे हे गाणं केवळ नृत्यापुरते मर्यादित राहत नाही, तर चित्रपटाच्या कथेला महत्त्वाचे वळण देणारा प्रसंग ठरतो.
वहीदा रहमान यांचेही आवडते गाणे
विशेष म्हणजे, ‘आज फिर जीने की तमन्ना है’ हे वहीदा रहमान यांचेही आवडते गाणे आहे. एका मुलाखतीत त्यांनी लता मंगेशकर यांच्या गायकीचे कौतुक करत हे गाणे आपल्याला खूप आवडत असल्याचे सांगितले होते. लतादीदींनी ज्या सहजतेने हे गाणे गायले, त्यामुळे त्यावर अभिनय करताना आपल्यालाही सहज वाटल्याचे त्यांनी नमूद केले होते.
तब्बल 61 वर्षांनंतरही ‘आज फिर जीने की तमन्ना है’ या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. तरुण पिढीपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना हे गाणे आवडते.