तनुश्री दत्ताच्या घरी गेलेली मुलं डिलिव्हरी बॉय, तिनेच ऑनलाईन…; तिच्या इमारतीच्या वॉचमेनचा धक्कादायक खुलासा

तक्रार केल्यानंतर पोलीस फॉलोअप घेण्यात टाळाटाळा करत असल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. मात्र आता पोलिसांची बाजू समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनुश्रीने  कंट्रोलला रुमला फोन केलेला मात्र नंतर तक्रार करण्यास नकार दिला. तसेच तनुश्री दत्ताच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

तनुश्री दत्ताच्या घरी गेलेली मुलं डिलिव्हरी बॉय, तिनेच ऑनलाईन...; तिच्या इमारतीच्या वॉचमेनचा धक्कादायक खुलासा
Police stand on Tanushree Dutta allegations
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2025 | 5:18 PM

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या त्या रडतानाच्या व्हिडीओमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. आणि या व्हिडीओचं सत्य सांगत आता तिने थेट याबद्दल नाना पाटेकरांना जबाबदार धरलं आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेलं नव्हतं. पण टिव्ही 9 मराठीशी बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांच स्पष्ट नाव घेऊन अनेक आरोप केले आहेत.

पोलीस फॉलोअप करण्यात टाळाटाळा करत असल्याचा आरोप 

तसेच तिने तिची बाजू मांडताना हे देखील म्हटले की पोलिसांमध्ये मी जेव्हा नाना पाटेकरांची तक्रार नोंदवली होती तेव्हा पोलिसांनी तक्रार लिहून घेतली पण त्याचा फॉलोअप घेण्याची वेळ आली की ते टाळाटाळ करायचे. तसेच तिच्याशी चांगलं बोलायचे पण पुढे काहीच घडायचं नाही. तिचं ऐकून घ्यायचे आणि तिच्यासोबत फोटो काढायचे. असाच आरोप आताही तिने केला होता. तनुश्रीने टिव्ही 9 मराठीशी बोलताना असंही म्हटलं की तिला होत असलेला हा त्रास कुठेतरी सहनकरण्यापलिकडे गेल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पण पोलीस कितपत मदत करतील यावर तिने शंका उपस्थित केली होती. आता याबाबत पोलिसांची बाजूही समोर आली आहे.


मात्र लगेच तक्रार देण्यास तनुश्रीचा नकार, पोलिसांची माहिती 

तनुश्री दत्ताच्या या सर्व आरोपांनंतर, मुंबई पोलिसांचे एक पथक तिच्या घरी पोहोचले होते. काल तनुश्रीने कंट्रोलला फोन गेल्यानंतर पोलिसांचे एक पथक तनुश्रीच्या घरी गेले होते, काही तक्रार आहे का यासंदर्भात देखील पोलिसांकडून विचारणा करण्यात आली मात्र, लगेच तक्रार देण्यास तनुश्रीचा नकार असल्याची पोलिसांनी सांगितलं. आज सकाळी (23 जुलै 2025) देखील मुंबई पोलिसांचे एक पथक तिच्या घरी पोहोचले होते. मात्र आज जेव्हा पोलिस तनुश्री दत्ताला भेटायला आले पण ती सापडली नाही. तसेच तनुश्री दत्ताकडून अद्याप तक्रार दाखल नसल्याचं ओशिवारा पोलिसांनी म्हटलं आहे. तनुश्री दत्ता उद्या संध्याकाळी ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तक्रार दाखल करायला ती आल्यास तक्रार नोंदवण्यात येईल असही पोलिसांनी म्हटलं आहे.

तनुश्री दत्ताच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून धक्कादायक खुलासा 

दरम्यान तनुश्री दत्ताच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने देखील धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने सांगितले की ‘काल (22 जुलै 2025) तिच्या घरी गेलेले लोक डिलिव्हरी बॉय होते आणि तनुश्री दत्ताने स्वतः ऑनलाइन ऑर्डर केली होती. “शिवाय CCTV फुटेजमधूनही ते स्पष्ट झालं आहे. दरम्यान नक्की हा सगळा काय प्रकार आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत . पोलीस तपासात नक्की काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.