
प्रेमात व्यक्ती कोणत्याही थराला पोहचू शकतो. आता देखील असंच काही झालं. दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करायचं म्हणून अभिनेत्रीने थेट लिव्हइन पार्टनरचा विषयच संपवला… सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून आतापर्यंत तीन कथित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीने मित्रांच्या मदतीने लिव्हइन पार्टनरचा काटा काढला… पण पोलिसांनी फक्त 12 दिवसांत अभिनेत्रीचा खरा चेहरा जगा समोर आणला आहे. सध्या याप्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने केलेल्या कृत्याची चर्चा सुरु आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीची टीका देखील केली आहे.
कन्नड अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदू हिने बेंगळुरू येथील मंजनाथनगर येथे धक्कादाक कृत्य केलं आहे. प्रेमाच्या त्रिकुटात बिंदू हिने स्वतःच्या पार्टनरसोबत लग्न करण्याऐवजी दुसऱ्याच पुरुषासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि एक कट रचत पार्टनरची हत्या केला… पोलिसांनी याप्रकरणी उर्मिला हिच्यासोबत तीन कथित आरोपींना अटक केली आहे. मोहन राव अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. 18 फेब्रुवारी रोजी मोहन राव याची हत्या करण्यात आली…
उर्मिला उर्फी बिंदू हिने ‘बजरंगी’, ‘पुलिस क्वार्टर्स’ आणि ‘कालभैरव’ यांसारख्या सिनेमांमध्ये छोट्या – छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता लिव्हइन पार्टनरच्या हत्येमुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिंदू आणि तिचा प्रियकर विनय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.. अशात दोघांनी मिळून मोहन राव याच्या हत्येचा कट रचला…
मोहन राव आणि बिंदू लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते… हत्येचा कट रचण्यासाठी त्यांनी घरात एका पर्टीचं आयोजन केलं होतं. जेथे बिंदू आणि मोहन एकत्र राहत होते. रिपोर्टनुसार, मृतक मोहन राव व्यवसाय करत होता… तर बायकोपासून विभक्त झाल्यानंतर मोहन याने बिंदू हिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला… बिंदू देखील तिच्या नवऱ्यासोबत राहत नव्हती…
दोन महिन्यांपूर्वी, बिंदू आणि राव यांनी मंजनाथ नगरमध्ये एक घर भाड्याने घेतलं. पण, त्यांनी औपचारिकपणे भाडे करारावर स्वाक्षरी केली नाही कारण त्यांनी सांगितलं होतं की, ते एका महिन्याच्या आत घर रिकामे करतील. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पार्टीत मोहन याला दारू पाजल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला… विनय याने मित्र धनुष याच्या मदतीने मोहन याच्यावर अनेक वार केले… जेव्हा मोहन मोठ्याने ओरडू लागला, तेव्हा बिंदू याने त्याच्या तोंडावर आणि नाकावर टेप लावली आणि हात पाय देखील बांधले.
असं देखील सांगितलं जात आहे की, श्वास कोंडल्यामुळे आणि जखमांमुळे मोहन याचं निधन झालं. त्यानंतर आरोपी फरार झाले. जवळपास 12 दिवसांनंतर शेजारच्यांना दुर्गंधी येऊ लागली. अशात पोलिसांना सूचना देण्यात आली. तेव्हा हत्येचं मोठं सत्य समोर आलं. 28 फेब्रुवारी रोजी घाणेरडा वास येत असल्यामुळे घर मालक नटराज यांनी पोलिसांना कळवलं.
पोलीस घटना स्थळी पोहोचल्यानंतर त्यांना मोहन याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला… पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी करत. ज्यामुळे संपूर्ण घटनाक्रम समोर येईल…