माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो, पूनम पांडे हे काय बोलून गेली ?

अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा चर्चेत आहे. तिने आपल्या बोल्ड अंदाजाचे समर्थन करत, अडल्ट व्हिडिओंना 'सामाजिक सेवा' म्हटलं. पुरुषांच्या मानसिक तणावाचा संदर्भ देत, तिने भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली .

माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो, पूनम पांडे हे काय बोलून गेली ?
Actress Poonam Pandey
| Updated on: Sep 05, 2026 | 5:16 PM

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Pooanm Pandey) तिच्या बोल्ड अंदाजासाठी आणि बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मात्र आता एका नव्या वादग्रस्त विधानामुळे ती लाईमलाइटमध्ये आली आहे. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनमने यावेळी चक्क अडल्ट कंटेंट आणि वेश्याव्यवसायाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळायला हवी, असं तिने म्हटलं. मात्र तिच्या या विधानामुळे खळबळ माजली असून सोशल मीडियावर देखील चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणाली पूनम पांडे ?

RVCJ Movies ला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडे हिने आपल्या बोल्ड आणि अडल्ट व्हिडिओंना ‘मोठी सोशल सर्व्हिस’ असं म्हटलंय. आजच्या काळात अनेक लोक तणाव आणि मानसिक दबावाचा सामना करत आहेत, विशेषतः पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रस्ट्रेशन आणि तणाव असतो, असं ती म्हणाली. माझ्या एखाद्या व्हिडिओमुळे एखाद्या व्यक्तीचा तणाव कमी होत असेल, तर त्यात गैर काय आहे? असा सवालच पूनमने उपस्थित केलाय. एवढंच नव्हे तर देशातील वाढत्या गुन्हेगारीचा संदर्भ देत तिने भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलं. यामुळे महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही घट होऊ शकते, असा दावा पूनमने केलाय.

पुरूषांबद्दल पूनमचं म्हणणं काय ?

पूनम पांडेने पुढे सांगितलंकी, समाजातील अनेक पुरुष मानसिक तणाव आणि फ्रस्ट्रेशनमधून जात असतात; मात्र त्यांच्या या परिस्थितीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. मी तयार केलेला कंटेंट एका विशिष्ट पद्धतीने आणि अतिशय सौंदर्यपूर्ण स्वरूपात सादर केला आहे, असं म्हणत तिने आपल्या अडल्ट व्हिडिओंचे समर्थन केलं. पूनमच्या म्हणण्यानुसार, तिचा एरॉटिक कंटेंट केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील लोकांसाठी एक प्रकारची ‘सोशल सर्व्हिस’ आहे.

ट्रोलिंग आणि टीकेवरही केलं भाष्य

आपल्या बोल्ड कंटेंटमुळे होणाऱ्या ट्रोलिंग आणि टीकेबाबतही पूनम स्पष्टपणेच बोलली. इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटी आणि माझे मित्रही त्यांच्या कंटेंटची खिल्ली उडवतात. मात्र, त्याच लोकांकडून खासगीत माझे व्हिडिओ पाहिले जातात, असा दावाच तिने केला.

टीका करणाऱ्यांचा राग येतो, त्यांच्या कमेंट्स वाचून माझा पारा चढतो, असंही पूनमने कबूल केलं. पण मी स्वत:ला शांत करते. अशा कमेंट्स करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेची मला कीव येते, असा टोला तिने हाणला. पूनम पांडे ही गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या बोल्ड फोटोशूट आणि व्हिडिओंमुळे चर्चेत आहे. तिच्या कंटेंटवर अनेकदा आक्षेपही घेण्यात आले आहेत आणि सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागलाय.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us