समंथा, रश्मिका की अनुष्का.. संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे, कोण मागे? जाणून घ्या Net Worth
साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींची संपत्ती किती? एका चित्रपटासाठी घेतात इतकं मानधन

समंथा रुथ प्रभू, रश्मिका मंदाना आणि अनुष्का शेट्टी या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. यांची फॅन फॉलोईंग काही बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकणारी आहे. या तिघींमध्ये संपत्तीच्या बाबतीत कोण कोणाच्या पुढे आहे, ते जाणून घेऊयात..

एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटामुळे अनुष्का शेट्टीला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेल्या देवसेना या भूमिकेला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. प्रभाससोबतची तिची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती.

रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी जवळपास सहा कोटी रुपये मानधन घेते. ती 120 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असल्याचं म्हटलं जातं.

नॅशनल क्रश रश्मिकाने टॉलिवूडनंतर बॉलिवूडच्या प्रवासालाही सुरुवात केली आहे. रश्मिकाचं मानधन दोन ते अडीच कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. ती जवळपास 45 कोटी रुपयांची मालकीण आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा 'यशोदा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. समंथाची संपत्ती की 80 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय.