AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 सोमवारचे व्रत करत आमिर खानच्या सावत्र भावासोबत थाटला संसार, पश्चाताप होताच म्हणाली, ‘सतत मारायचा आणि…’

आमिर खानच्या सावत्र भावासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं 18 दिवसांचं अफेअर... लग्नाच्या चौथ्या दिवशी समोर आलं धक्कादायक सत्य... पश्चाताप होताच म्हणाली, 'सतत मारायचा आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

16 सोमवारचे व्रत करत आमिर खानच्या सावत्र भावासोबत थाटला संसार, पश्चाताप होताच म्हणाली, 'सतत मारायचा आणि...'
| Updated on: Jun 10, 2026 | 1:59 PM
Share

टीव्ही अभिनेत्री ईवा ग्रोवर हिने तिच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ईवा हिने अभिनेता आमिर खान याचा सावत्र भाऊ हैदर अली खान याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. ईवा हिने कुटुंबियांच्या विरोधात जात दसऱ्या धर्मात लग्न केलं. पण फार लवकर अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचा आनंद मिळालाच नाही. तर नवरा अभिनेत्रीला सतत मारहाण आणि शिवीगाळ करायचा. सांगायचं झालं तर, ईवा हिने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.

ईवा म्हणाली, ‘जेव्हा मी 15 – 16 वर्षांची होते, तेव्हाच माझ्यावर लग्न करण्याचं वेड होतं. मी लग्नासाठी 16 सोमवारचे व्रत देखील कले. लग्न आणि माझी मुलं… असं माझं स्वप्न होतं. लग्नानंतर मला जसं आयुष्य हवं होतं, तसं काहीही झालं नाही. मी 27 वर्षांची असताना हैदर याच्यासोबत मी लग्न केलं. फक्त 18 दिवस डेट केल्यानंतर 19 व्या दिवशी आम्ही लग्न केलं. पण लग्नाच्या 4 दिवसांनंतर हैदर याचा खरा चेहरा समोर आला. जो मला त्या 18 दिवसांमध्ये कधी कळू शकलाच नाही.’

‘यामध्ये फक्त त्याचीच नाही तर, माझी देखील चूक होती. माझी आई आणि मैत्रिणींनी मला सांगितलं होतं, हैदर याच्यासोबत लग्न करू नकोस. पण 19 व्या दिवशी मी पळून हैदर याच्यासोबत लग्न केलं. तेव्हा मी माझ्या करियरच्या पिकवर होती. लग्नानंतर मला कळलं की, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. तो प्रचंड रागीट होता. मला सतत मारहाण करायचा… मी कधीच माझ्या घरी कोणत्या पुरुषाला महिलेला मारहाण करताना पाहिलेलं नाही. तो सतत मला मारायचा, पण तरी देखील मी माझं नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. पण असं काहीही झालं नाही.’ मुलीच्या जन्मानंतर देखील ईवा आणि हैदर यांचं नातं योग्य मार्गावर आलं नाही. उलट समस्या अधिक वाढल्या.

ईवा म्हणते, ‘दिवसागणिक माझा मानसिक ताण वाढतच होता. तेव्हा ‘वक्त बताएगा कौन अपना कौन पराया’ मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. माझ्या टीमला कळलं होती, माझ्या खासगी आयुष्यात अनेक समस्या आहे. तेव्हा त्यांनी माझ्या आईला सांगितलं, ईवा हिला या लग्नातून मुक्त केलं पाहिजे. अखेर सर्वांची साथ मिळाल्यानंतर मी हैदर याला सोडू शकली… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, आमिर खान याचे वडील ताहिर हुसैन यांनी दोन लग्न केली. त्यांचे पहिले लग्न झीनत हुसेन यांच्याशी झाले होते आणि त्यांना चार मुले होती: आमीर खान, फैसल खान, फरहत खान आणि निखत खान. त्यांचे दुसरे लग्न शहनाज हुसेन यांच्याशी झाले होते आणि त्यांना हैदर नावाचा मुलगा होता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा