घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचा मोठा निर्णय; नवऱ्याचं नाव हटवून त्या ठिकाणी..

टेनिसपटू सानिया मिर्झा ही घटस्फोटानंतर दुबईत तिच्या मुलासोबत राहतेय. नुकतेच तिने इन्स्टाग्रावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतील नेमप्लेटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सानिया आणि शोएबने 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. भारत आणि पाकिस्तानात या दोघांचं नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता.

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचा मोठा निर्णय; नवऱ्याचं नाव हटवून त्या ठिकाणी..
सानिया मिर्झा, शोएब मलिक
Image Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2024 | 9:58 AM

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे काही महिन्यांपूर्वीच विभक्त झाले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाहचे फोटो टाकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सानियाची बहीण अनम मिर्झाने त्या दोघांच्या घटस्फोटाविषयीची माहिती दिली होती. सानिया तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी व्यक्त झाली नाही. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. घटस्फोटानंतरही तिने इन्स्टाग्रामवर विविध फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईतील घरात राहत आहे. या घराच्या नेमप्लेटचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सानियाने पोस्ट केलेल्या या नेमप्लेटवर दोन नावं दिसत आहेत. सानिया आणि इझहान ही दोन नावं त्यावर लिहिली आहेत. इझहान हे सानिया आणि शोएबच्या मुलाचं नाव आहे. घटस्फोटानंतर तो आईकडेच राहतोय. सानिया आणि शोएबने एप्रिल 2010 मध्ये लग्न केलं होतं. त्यापूर्वी शोएबचं लग्न आयेशा सिद्दिकी नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. सानियासोबत त्याचं दुसरं लग्न होतं. आता सानियाला घटस्फोट दिल्यानंतर त्याने सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे.

जानेवारी महिन्यात शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. या निकाहचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सानियासोबतच्या घटस्फोटाची चर्चा झाली. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आली की, सानियाने शोएबला ‘खुला’ दिला आहे. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईमध्ये राहतेय. या दोघांना इझहान मिर्झा मलिक हा मुलगा आहे.

दुसरीकडे शोएब आणि सना हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याविषयी पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, “एका टेलिव्हिजन रिॲलिटी शोदरम्यान सना आणि शोएब यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर शोएब जेव्हा कधी टीव्हीवर यायचा, तेव्हा तो सनालाही सोबत आणण्याबद्दल आग्रह करायचा.”