Prahaar The untold Story OTT: ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ सिनेमा घरबसल्या पाहाता येणार? OTT रिलिज डेट काय?
Prahaar The untold Story OTT: ललित प्रभाकर आणि राजकुमार राव यांच्या ‘प्रहार’ सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांच्या गर्दीत समाधानकारक कामगिरी केली आहे. आता हा सिनेमा घरबसल्या बघता येणार आहे.

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेता वामिका गब्बी यांचा ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या पार्श्वभूमीवर चित्रपट घरबसल्या कधी पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाच्या रिलिजची डेट समोर आली आहे चला जाणून घेऊया…
अविनाश अरुण दिग्दर्शित ‘प्रहार’ हा सिनेमा उज्ज्वल निकम आणि भारतातील काही अतिशय उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांची बाजू मांडताना त्यांना आलेल्या संघर्षांवर आधारित आहे. आता या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबद्दल मोठा अपडेट आला आहे. चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचा लोगो चित्रपटाच्या सुरुवातीच्या जाहिरातींमध्ये दिसत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स हे त्याचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
‘प्रहार’ ओटीटीवर कधी रिलीज होणार?
चित्रपट निर्माते आणि प्लॅटफॉर्म या दोघांनीही चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अधिकृतपणे जाहिर केलेली नाही. मात्र चित्रपट साधारणतः चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतात. यात बदलही होऊ शकतो. अंदाजानुसार ‘प्रहार’ २७ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान नेटफ्लिक्सवर येऊ शकते. या तारखा केवळ अंदाज आहेत. निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.