Prajakta Hanamghar: तिला सेक्स भावात…. प्राजक्ताबद्दल बोलताना तिच्या मित्राची पोस्ट, काय म्हणाला?

Prajakta Hanamghar: सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर ही चांगलीच चर्चेत आहे. तिला एका मुलाखतीमधील वक्तव्यामुळे चांगलेच ट्रोल केले जात आहे. आता प्राजक्ताच्या मित्राने तिला पाठिंबा दिला आहे.

Prajakta Hanamghar: तिला सेक्स भावात…. प्राजक्ताबद्दल बोलताना तिच्या मित्राची पोस्ट, काय म्हणाला?
Prajakta Hanamghar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 11:31 AM

कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर. प्राजक्ताने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलिंगवर भाष्य केले. त्यानंतर तिला सोशल मीडियावर अनेकांनी पाठिंबा दिला. प्राजक्तासाठी अभिनेता, लेखक पंकज पंचारियाने एक पोस्ट लिहिली. त्याने तिला सुनावणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले.

काय म्हणाला पंकज?

Loading...

पंकज पंचारियाने प्राजक्ताला पाठिंबा देत पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने तिला (प्राजक्ताला) चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला सुनावले आहे. तसेच त्याने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. आता पंकजची पोस्ट काय आहे ते वाचा…

“तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नको”

प्राजक्ताने शेअर केलेल्या पंकजच्या पोस्टमध्ये म्हटले की, मला शाळेत सेक्स एज्युकेशन शिकवले नाही, पण जगात खूप अभ्यास करता येऊ शकतो. प्राजक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण विचारांच्या खिडकीतून आमचे विचार वेगळे आहेत. म्हणून तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस. समलिंगी असणे हा गुन्हा नाही. विरुद्ध लिंगी असणे ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. जर विरुद्ध लिंगी लोकच महान असते, तर बाबा बंगालीकडे गुपचुप जाऊन लिंग ताठरण्याच्या गोळ्या लोक कशाला घ्यायला गेले असते?

“मित्रा, असे नका वागू!”

पुढे त्या पोस्टमध्ये पंकज म्हणाला की, सचिनभाऊंसारख्या लोकांमुळे लॉकडाऊनमध्ये ९ समलिंगी लोकांनी स्वत:चे जीवन संपवले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. सारंग पुणेकर (भारतातली पहिली ट्रान्सजेंडर् जिने पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले) सारखी मैत्रीण सुद्धा गेलेली मी पाहिली आहे. मित्रा, असे नका वागू! अक्कल असेल तर समानतेने जगा आणि जगू द्या. टीप :- मला कोणत्याच राजकीय विचारांशी देणेघेणे नाही. लैंगिक समानता असावी, इतकीच साधी अपेक्षा आहे.

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. तिने ट्रोलिंगवर केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या पुन्हा निशाणा साधला. त्यानंतर प्राजक्ताचा जवळचा मित्र तिच्या बाजूने उभा राहिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us