AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local: जमिनीखालून धावणार आता लोकल! चर्चगेट ते विरार दरम्यान अंडरगाऊंड रेल्वे नेटवर्क, कधी होणार सुरूवात?

Churchgate to Virar Underground Railway: मुंबईकरांसाठी आनंदवार्ता आहे. लोकल प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुकर आणि वेगवान होणार आहे. त्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकण्यात येते आहे. यामुळे सध्याच्या लोकलवरील ताण कमी होईल.

Mumbai Local: जमिनीखालून धावणार आता लोकल! चर्चगेट ते विरार दरम्यान अंडरगाऊंड रेल्वे नेटवर्क, कधी होणार सुरूवात?
चर्चगेट ते विरार दरम्यान अंडरगाऊंड रेल्वे नेटवर्क
| Updated on: Oct 25, 2026 | 12:26 PM
Share

Churchgate to Virar Underground Railway: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अजून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम चर्चगेट ते विरार या दरम्यान एक भूमिगत उपनगरीय रेल्वे नेटवर्क उभारण्याची तयारी लवकरच सुरू होऊ शकते. याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यावर आहे. रेल्वे बोर्डाने निधी मंजूर केल्यास लवकरच तो अस्तित्वात येईल. यामुळे मुंबईतील वाढत्या गर्दीला मोठा पर्याय निर्माण होईल. यामुळे सध्याच्या लोकलवरील ताण कमी होईल.

अगोदर पाहणी अहवाल

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, भूमिगत लोकल ट्रेन मार्ग विकसीत करणे हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या किती आव्हानात्मक आहे आणि ते शक्य आहे की नाही, याची पाहणी करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाला जर या अहवालानंतर मंजूर निधी मिळाल्यास अगोदर प्रत्यक्ष पाहणी आणि अहवाल तयार करण्यात येईल. जर या अभ्यासाचे सकारात्मक परिणाम आणि व्यावाहारिक बाबी समोर आल्या तर नंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पाला पुढील गती देण्यात येईल.

प्रवाशांचा लोकलवर वाढता ताण

पश्चिम रेल्वेवर सध्या रोज 1414 लोकल फेऱ्या होतात. वाढत्या प्रवाशी संख्येमुळे लोकल सेवांवर ताण येत आहे. जमिनीच्या खालून भूमिगत रेल्वे जाळे तयार केल्यास मोठा फायदा होईल. अत्याधुनिक स्टेशन्स, आत येण्याची आणि बाहेर पडण्याच्या मार्गिका आणि प्रवाशांना सोयीच्या दृष्टीने तिचा वापर आणि रेल्वे स्थानकांचाही विचार होणार आहे. मेट्रो स्टेशनच्या जवळची कनेक्टिव्हिटी आणि इतर बाबींचा विचार करण्यात येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून स्वतंत्र अभ्यास

पश्चिम रेल्वेसोबतच मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून स्वतंत्र अभ्यास करण्यात येणार आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ अशा दोन महत्त्वाच्या कॉरिडोअरसाठी भूमिगत जोडणीचा अभ्यास करण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प विचाराधीन आहे. सर्व्हेक्षणानंतरच तो अस्तित्वात येईल की नाही हे समोर येईल.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल