बॉयफ्रेंडकडून फसवणूक, स्वबळावर कमावलं नाव; 37व्या वर्षीही सिंगल, अफाट संपत्तीची मालकीण आहे ही मराठी अभिनेत्री
Marathi Actress : ही मराठी अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल

मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्रींनी स्वबळावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिनं इंडस्ट्रीमध्ये कुणीही 'गॉड फादर' नसताना नाव कमावलं. आज ही अभिनेत्री आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणीही नसून प्राजक्ता माळी आहे. प्राजक्ता प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. वयाच्या 37व्या वर्षी अभिनेत्री सिंगल आहे.
एका मुलाखतीत प्राजक्तानं तिच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलेलं. बॉयफ्रेंडनं फसवणूक केल्यामुळे अभिनेत्रीनं त्याच्यासोबत ब्रेकअप केला.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणालेली की, 'तो माझ्याशी खोटं बोलायचा. मी त्याचं खोटं पकडलंदेखील होतं. पण तो ते मान्य करतच नव्हता.'
प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं 'जुळून येती रेशीमगाठी' 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या मालिकांमध्ये तर 'फुलवंती', 'चिकी चिकी बुबुम बूम' यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
प्राजक्ताचा स्वतःचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँडही आहे. त्यातूनही ती कमाई करते.
अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल सांगायचं तर मीडिया रिपोर्टनुसार प्राजक्ताचं नेटवर्थ 40 कोटींच्या आसपास आहे. तिचं कर्जतला एक मोठं फार्महाउससुद्धा आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीनं गिरगावमध्ये 6 कोटींचा फ्लॅटही खरेदी केला आहे.