‘…म्हणून मी त्याला रितसर ‘जय महाराष्ट्र’ केलं’, अफेअरबद्दल प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

Prajakta Mali on Personal Life: प्राजक्ता माळी हिने अखेर अफेअरबद्दल मोठा खुलासा केलाच; म्हणाली, '...म्हणून मी त्याला रितसर 'जय महाराष्ट्र' केलं', प्राजक्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

...म्हणून मी त्याला रितसर जय महाराष्ट्र केलं, अफेअरबद्दल प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा
| Updated on: Apr 26, 2025 | 12:52 PM

Prajakta Mali on Personal Life: सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सेलिब्रिटी देखील त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या खासगी आयुष्याबद्दल… प्राजक्त माळी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमा, मालिका आणि शोमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. पण प्राजक्ताला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तू लग्न कधी करणार?’ या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्ता एका मुलाखतीत म्हणालेली, ‘मी माझ्या आईला मुलगा बघायला सांगितलं आहे…’

प्राजक्ताने आईला मुलगा बघण्यासाठी सांगितलं आहे. पण प्राजक्ताच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. दोघांचं नातं मात्र फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या अफेअरबद्दल देखील सांगितलं होतं. सध्या सर्वत्र प्राजक्ता माळी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

प्राजक्ता माळी म्हणाली, ‘डोक्याची मंडई होणार असेल तर माझ्या आयुष्यात मानसिक शातंतेला अधिक प्राधान्य आहे… तुमचं डोकंच जर शांत नसेल तर, बिशाद की तुला एवढं सगळं करायला सुचेल… एका लाईफपार्टनरमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं…’

‘तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य, आर्थिक गणित, मानसिक आरोग्य… लग्न फार मोठा निर्णय आहे आणि फार मोठी रिस्कदेखील… काही मुलींना शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गरजा असतात. म्हणून त्यांच्यासाठी लग्न फार सोपी गोष्ट आहे. पण अध्यात्मामुळे माझ्या मानसिक आणि भावनिक गरजा फार कमी झाल्या आहेत. गरजाच संपल्या तर ते नातं देखील कशाच्या जीवावर तरणार… फक्त विश्वास आणि प्रामाणिकपणावर… पण अशा नात्याची गॅरंटी या कलियुगात तरी कोण देणार…?’ असा प्रश्न देखील प्राजक्ताने यावेळी उपस्थितीत केला.

पुढे प्राजक्ता म्हणाली, ‘नातं प्रामाणिक असेल तरच टिकेल. आईला पण मी याच गोष्टी समजावत असते. मी प्रेमात पडते. पण नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत नसणार आहे. यातून बाहेर पडणं योग्य आहे. अशात मी समोरच्या व्यक्तीला सांगते, मित्रा सगळं छान आहे पण जरा प्रॉब्लेम आहे. तू घरी जा… आपण थांबूयात… असं मी सांगितलेलं देखील आहे. तू खोटं बोलतोस माझ्यासोबत… मी तुला पकडलेलं आहे… माझ्याकडे पुरावे आहे… त्याला मी रितसर जय महाराष्ट्र केलं आहे…’ असं देखील प्राजक्ता म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.