Prajakta Mali : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीमध्ये…प्राजक्ता माळीचं वक्तव्य, काय घडलं?
Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते.
अशातच आता प्राजक्तानं क्रांती रेडकरसाठी पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्तानं क्रांती रेडकरच्या आगामी मैत्रेया चित्रपटाला शुभेच्छा देताना खास पोस्ट लिहिली आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'हे क्रांती ताई, तू मला अनेक प्रकारे प्रेरित आणि प्रोत्साहित केलं आहेस आणि हे त्याचंच आणखी एक उदाहरण आहे.'
'तू जे करत आहेस ते खरोखरच उत्कृष्ट आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीमध्ये इतक्या खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणं, तसंच दोन लहान जुळ्या मुलांचा सांभाळ करणं, ही काही साधी गोष्ट नाही, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.'
'माझं संपूर्ण प्रेम आणि पाठिंबा नेहमी तुझ्यासोबत आहे. ट्रेलर खूप आवडला. चित्रपटाला यश आणि खूप खूप शुभेच्छा! आणि आपल्यातलं “मैत्रेय” पण असंच बहरत राहो…' असं प्राजक्तानं शेवटी म्हटलं आहे.