‘छी हा काय प्रकार?..’ प्राजक्ता माळीचा पुरण वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल; तिची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती पुरण वाटताना दिसत आहे. पण प्राजक्ताची पुरण वाटण्याची पद्धत नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यामुळे प्राजक्ताला या व्हिडीओवरून प्रचंड ट्रोल केलं जात आहे.  

छी हा काय प्रकार?.. प्राजक्ता माळीचा पुरण वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल; तिची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Prajakta Mali cooking method
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 7:18 PM

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असतेच. मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यांचे व्हिडीओ  आणि मुख्य म्हणजे  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील तिचे मिम्स आणि रील सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे प्राजक्ताला वेगळी ओळख मिळाली. शो मध्ये तिचे ‘वाह दादा वाह’ सारखे अनेक डायलॉग,तिचं हसणं, तिचा डान्स किंवा तिचं निवेदन करण्याची पद्धत, चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडू लागला. ‘फुलवंती’ चित्रपटानंतर तर तिची फॅनफॉलोइंग अजूनच वाढली आहे.

प्राजक्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्राजक्ता बऱ्यचदा अनेक कारणांमुळे ट्रोलही होते. जसं की, मुलाखतींमध्ये तिने मांडलेले मुद्दे असोत किंवा मग अध्यात्माविषयी तिने केलेली चर्चा असो. यामुळे बऱ्याचदा तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. प्राजक्ता तशी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या रील आणि रीअल लाईफचे अपडेट ती स्वत: आपल्या चाहत्यांना देत असते. प्राजक्ताचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओवरून बऱ्याच जणांनी तिला ट्रोलही केलं आहे.

 पुरण वाटण्याच्या पद्धतीवरून प्राजक्ता ट्रोल 

प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने लाल रंगाचा ब्लाऊजसोबत पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ किचनमधला आहे. घरात कोणत्यातरी सणानिमित्ताने किंवा पूजेनिमित्त पुरणपोळीचा बेत ठरवण्यात आला आहे. आणि त्याचीच तयारी ती करत असल्याचं दिसत आहे. प्राजक्ता पुरण वाटताना दिसत आहे. पण प्राजक्ता हे पुरण कोणत्याही पुरण यंत्रात किंवा पाट्यावर वाटताना दिसत नाहीये तर ती हे पुरण थेट ओट्यावर वाटतेय. प्राजक्ताची ही पद्धत नेटकऱ्यांना आवडली नसल्याचं दिसून आलं आहे.


नेटकऱ्यांनी प्राजक्ताला सुनावलं 

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी विशेषत: महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिला अशा पद्धतीने पुरण वाटण्यावरून चांगलंच ट्रोलही केलं जात आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ जुना असल्याचं समजून येत आहे. पण सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची चर्चाही तेवढीच होत आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे “हल्ली डायरेक्ट ओट्यावर चपाती, पोळी लाटण्याची फॅशन आलीय.. जी अत्यंत चुकीची आहे.” एका युजरने म्हटलं आहे “छी हा काय प्रकार? डायरेक्ट गॅस ओट्यावर वाटतेय.. बाजूलाच बेसिग पण आहे”