बजेटमध्ये नाट्यगृहांचा विचार करा, एफडीच्या व्याजातून मेंटेनन्स करा, प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Feb 10, 2021 | 1:59 PM

(Prashant Damle Uddhav Thackeray)

बजेटमध्ये नाट्यगृहांचा विचार करा, एफडीच्या व्याजातून मेंटेनन्स करा, प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रशांत दामले, उद्धव ठाकरे
Follow us on

सांगली : नाट्यगृह बांधणं सोपं आहे, पण देखभाल करणं अवघड आहे. राज्यातील सर्व नाट्यगृह एकाच अपेक्स बॉडीच्या अंतर्गत आणावीत, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केली आहे. कलाकारांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना प्रशांत दामलेंनी मागणी केली. (Prashant Damle request for Marathi theatres to CM Uddhav Thackeray)

महाराष्ट्रात मराठी नाटक सादर करु शकणाऱ्या 63 नाट्यगृहांची देखभाल करणे अवघड आहे. महापलिका किंवा नगरपंचायत असेल त्यांना नाट्यगृह बांधण्यासाठी अनुदान मिळू शकते. नाट्यगृह बांधता येते, पण देखभाल-दुरुस्ती करणे अवघड आहे, असं प्रशांत दामले म्हणाले.

एफडीच्या व्याजावर नाट्यगृहांचं मेंटेनन्स

राज्यातील 63 नाट्यगृह एका अॅपेक्स बॉडीच्या अंतर्गत आणावीत. एखादे बंद असलेले नाट्यगृह अॅपेक्स बॉडीकडे द्यावे. अर्थमंत्र्यांनी पुढच्या अर्थ संकल्पात 200 किंवा 500 कोटी बाजूला काढावेत आणि या पैशाची बँकेत एफडी करावी. या एफडीच्या व्याजावर ही सर्व नाट्यगृह मेंटेन करता येतील. याचा मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, अर्थमंत्री यांनी विचार करावा, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे.

अनलॉक सुरु झाले आहे. 10 महिन्यांच्या कोरोना काळानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाने पश्चिम महाराष्ट्राचे दौरे सुरु केले आहेत. एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे, अशी माहिती प्रशांत दामलेंनी दिली.

केवळ कोरोना काळातच नाटक बंद

ज्यांना मराठी नाटकच आवडतं, लाईव्ह मनोरंजन आवडतं, ते रसिक नाटक बघायला येतातच. मग काहीही झालं तरी ते नाटक बघायला येणार. सगळं बंद होतं, म्हणून आम्ही बाहेर पडलो नाही. मात्र बॉम्बस्फोट झाला, 200 चे 350 चॅनल झाले, जगात दुसरे महायुद्ध झाले, तेव्हाही नाटक सुरु होते. मात्र कोरोना हा एकच काळ होता जे सर्वच बंद होते. सर्वच बंद असल्यामुळे आपण सर्वजण छान जगतोय आणि सर्व जण सुरक्षित राहिलो, असं अभिनेते प्रशांत दामले म्हणाले.

संबंधित बातम्या :

प्रशांत दामले, सुभाष घईंसह 45 कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांकडून सन्मान

(Prashant Damle request for Marathi theatres to CM Uddhav Thackeray)