Google कडून शिकली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली, मिस टीन यूनिवर्स इंडिया प्रसुची पांडाची उल्लेखनीय कामगिरी

Prasuci Panda Miss Teen Universe India 2026: प्रसुची पांडा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समान्य घरातील प्रसूची हिने गुगलच्या जोरावर स्वतःचं नाव मोठं केलं. आहे. मिस टीन यूनिवर्स इंडिया प्रसूची पांडा हिच्याबद्दल घ्या जाणून...

Google कडून शिकली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली, मिस टीन यूनिवर्स इंडिया प्रसुची पांडाची उल्लेखनीय कामगिरी
Prasuci Panda
| Updated on: Jul 27, 2026 | 12:27 PM

Prasuci Panda Miss Teen Universe India 2026 : आज पाहायला गेलं तर, पूर्वी पेक्षा अधीक सुविधा आहे. पण या सुविधांचा फायदा सर्वांनाच मिळतो किंवा घेता येतो असं काहीही नाही. यश हे अनेकदा केवळ साधनसामग्रीमुळे नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळतं. हिच जिद्द मनात ठेवत ओडिशात राहणाऱ्या प्रसुची पांडा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. प्रसुची हिने ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026’ जिंकत फक्त कुटुंबाचंच नाही तर, संपूर्ण राज्याचं नाव देखील मोठं केलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी तिच्याकडे कोणताही राष्ट्रीय स्तरावरील किताब नव्हता आणि तिने कोणत्याही मोठ्या ‘ग्रूमिंग अकादमी’कडून प्रशिक्षण देखील घेतलेलं नव्हतं. असं असताना देखील तिने यश मिळवलं आहे.

‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026’ किताबावर स्वतःचं नाव कोरल्यानंतर प्रसुची भुवनेश्वर येथे पोहोचली, जेथे ओडिशाच्या लेकीचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. शहरातील एका भव्य हॉटेलमध्ये प्रसुची हिच्यासाठी भव्य अभिनंदन सोहळ्याचं आजोजन करण्यात आलेलं. जेथे मोठ्या संख्येने तिचे समर्थक पोहोचले होते. यावेळी सर्वांनीच प्रसुची हिला शुभेच्छा दिल्या.

गुगल आणि इंटरनेच्या माध्यमातून केली तयारी…

प्रसुची हिचा आई राणी पांडा म्हणाल्या, ‘हा प्रवास आमच्या कुटुंबासाठी अत्यंत नवीन आणि आव्हानपूर्ण होता जेव्हा प्रसुची हिने या क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा, या क्षेत्राबद्दल आम्हाला कोणालाच काहीच माहिती नव्हतं. अन्य स्पर्धकांकडे अनुभवी ट्रेनर आणि संपूर्ण टीम होती. पण प्रसुचीने सर्व तयारी स्वतःच केलेली. इंटरनेट आणि गुगलच्या मदतीने तिने रँप वॉक, ग्रुमिंग आणि स्पर्धेसंबंधित सर्व गोष्टी माहिती करुन घेतल्या. आज आमच्या लेकीमुळे लोक आम्हाला ओळखत आहेत… आता यापुढे देखील कामय तिच्यासोबत उभे राहणार…’ असं देखील प्रसुची हिच्या आई म्हणाल्या.

एप्रिलपासून सुरु केली तयार; आता ती आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचेल प्रसुची

मिळालेल्या माहितीनुसार प्रसुची पांडा सध्या 11 वी इयत्तेत शिकत असून तिने एप्रिल 2026 पासून स्पर्धेची तयारी केली. या काळात तिने विशेषतः तिच्या ‘रॅम्प वॉक’ आणि संवाद कौशल्यांवर खूप मेहनत घेतली. प्रसुची म्हणाली, ही तिची पहिलीच राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा होती आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणं ही तिच्यासाठी अत्यंत खास गोष्ट आहे. आता ती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या यशामुळे तिने आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि समुदायाचं नाव उंचावले असून, यामुळे तिला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us