
Preity Zinta on Arjun Tendulkar: क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर सध्या तुफान चर्चेत आहेत. कारण सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाला. 13 ऑगस्ट रोजी सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत झाला आहे. ज्यामुळे अर्जन तुफान चर्चेत आहे. अर्जुन कायम पापाराझी आणि लाईम लाईटपासून दूर राहत असतो. पण एक वेळ अशी देखील आली होती जेव्हा अर्जुन याला टीकेचा सामना करावा लागला होता. तेव्हा अभिनेत्री प्रिती झिंटा हिने सचिन यांच्या मुलाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या खराब कामगिरीबद्दल अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा हिने चिंता व्यक्त केली होती. सोशल मीडियावर प्रिती झिंटा हिने एक पोस्ट शेअर केली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रिती झिंटा म्हणाली. ‘मी आशा करते की सर्व काही ठिक होईल. मी एका तरुणासाठी चिंतेत आहे. ज्याला मी अद्यापही लहान मुलगा समजते. त्याचं आडनाव तेंडुलकर असल्यामुळे मी बोलत नाही. मला असं वाटतं को पुन्हा नव्याने कमबॅक करेल आणि त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागणार नाही… असं सर्वांसोबत होतं…’
यावर क्रिकेटर हरभजन सिंग देखील व्यक्त झाला होता. “तो यातून खूप काही शिकेल. आम्हालाही अनेकदा फटकारण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता. जो चुका करत नाही तो कधीही शिकू शकत नाही. जे काही घडलं ते चांगलंच आहे. तो आजच्या सामन्यातून खूप काही शिकेल.”
क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर सध्या तुफान चर्चेत आहेत. कारण सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाला. उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत अर्जुन लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सारा आणि अर्जुन दोघेही इन्स्टाग्रामवर सानिया चांडोकला फॉलो करतात. सानियाही त्यांना फॉलो करते. याशिवाय त्यांचे अनेक एकत्र फोटोही आहेत. हे स्पष्ट आहे की ही ओळख नवीन नाही आणि आता याला एका नवीन नात्याचं नाव देण्यात आलं आहे.